गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामाती धडाकेबाज सुरुवात केली आहे. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरचा निर्णय चुकला. ट्रेंट बोल्टने मार्कस स्टॉयनिस आणि अजिंक्य रहाणे यांना स्वस्तात माघारी धाडत दिल्लीला दोन मोठे धक्के दिले.

अंतिम सामन्यात मुंबईने संघात बदल करत राहुल चहरऐवजी जयंत यादवला स्थान दिलं. दिल्लीच्या संघातील डावखुऱ्या फलंदाजांची फौज पाहता मुंबईने जयंत यादवच्या अनुभवाला पसंती दर्शवण्याचं ठरवलं. जयंत यादवनेही आपल्यावर दाखवण्यात आलेला विश्वास सार्थ ठरवत फॉर्मात असलेल्या शिखर धवनची दांडी गुल केली. पाहा हा व्हिडीओ…

दरम्यान पहिल्याच चेंडूवर स्टॉयनिसला माघारी धाडत ट्रेंट बोल्टनेही अंतिम सामन्यात विक्रमाची नोंद केली. आयपीएलच्या इतिहासात अंतिम फेरीत पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

अवश्य वाचा – IPL 2020 : दिल्लीचा हुकुमी एक्का वाया, स्टॉयनिसला पहिल्याच चेंडूवर बाद करत बोल्टचा विक्रम

Story img Loader