भरवशाच्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी केलेला निराशाजनक खेळ राजस्थान रॉयल्सला चांगलाच महागात पडला आहे. स्पर्धेत आव्हान टिकवण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात राजस्थानला कोलकाता नाईट रायडर्सकडून ६० धावांनी पराभव स्विकारावा लागला. राजस्थानचा संघ १३१ धावांपर्यंतच मजल मारु शकला. या पराभवासोबत राजस्थानचं आयपीएलच्या तेराव्या हंगामातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानची पहिल्यापासून खराब सुरुवात झाली. पॅट कमिन्स आणि इतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे राजस्थानच्या सर्व फलंदाजांनी नांगी टाकली. मधल्या फळीत जोस बटलर आणि राहुल तेवतिया यांनी काही क्षणांसाठी भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांचे प्रयत्नही अपुरे पडले. राजस्थानकडून बटलरने ३५ तर तेवतियाने ३१ धावांची खेळी केली. KKR कडून पॅट कमिन्सने ४, वरुण चक्रवर्ती आणि शिवम मवीने प्रत्येकी २-२ तर कमलेश नागरकोटी १ बळी घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजस्थान रॉयल्सवर मिळवलेल्या विजयासह KKR ने १४ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. असं असलं तरीही त्यांचं प्ले-ऑफमधलं स्थान अद्याप निश्चीत झालेलं नाही. सोमवारी दिल्ली विरुद्ध बंगळुरु या सामन्यात बंगळुरुचा संघ २२ किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी हरला, किंवा दिल्लीचा संघ १८ किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी हरला तरच कोलकाता नाईट रायडर्सचा संघ प्ले-ऑफमध्ये दाखल होऊ शकतो. या दोन्ही शक्यतांव्यतिरीक्त सामन्याचा निकाल अखेरच्या षटकांत लागला तर दिल्ली आणि बंगळुरु हे दोन्ही संघ प्ले-ऑफमध्ये दाखल होतील. असं झाल्यास यानंतर KKR ला ३ तारखेच्या सामन्यात मुंबईने हैदराबादवर मात करण गरजेचं ठरणार आहे.

त्याआधी, कर्णधार ओएन मॉर्गनचं नाबाद अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने महत्वाच्या सामन्यात १९१ धावांपर्यंत मजल मारली. सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करताना राजस्थानच्या संघाने आश्वासक मारा केला. परंतू संघ संकटात सापडलेला असताना कर्णधार मॉर्गन आणि आंद्रे रसेलने फटकेबाजी करत राजस्थानसमोर मोठं आव्हान निर्माण केलं. मॉर्गनने नाबाद ६८ धावांची खेळी केली. त्याच्या अर्धशतकी खेळीत ५ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.