किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल यंदा चांगल्याच फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी लोकेश राहुलला बढती देत उप-कर्णधारपदी नियुक्त करण्यात आलं आहे. संघात झालेली आपली निवड सार्थ ठरवत लोकेश राहुलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात मैलाचा दगड पार केला आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात लोकेश राहुलने ६०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आयपीएलच्या इतिहासात राहुलने दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे.
२०१८ साली राहुलने आयपीएलच्या हंगामात ६०० धावांचा टप्पा ओलांडला होता. सचिन तेंडुलकरलाही अशी कामगिरी करणं जमलं नव्हतं. राहुलव्यतिरीक्त विराट कोहलीने अशी कामगिरी केली आहे.
Indians Scoring 600+ runs in an IPL Season
Sachin (2010)
Kohli (2013)
Uthappa (2014)
Kohli (2016)
Pant (2018)
Kl Rahul (2018)
Rayudu (2018)
Kl Rahul (2020)*#RRvsKXIP— CricBeat (@Cric_beat) October 30, 2020
नाणेफेक जिंकत राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोफ्रा आर्चरने आपल्या लौकिकाला साजेसा मारा करत पहिल्याच षटकात मनदीप सिंहला माघारी धाडलं. मात्र यानंतर राहुल आणि ख्रिस गेल यांनी फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला.