मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या आयपीएलच्या इतिहासात आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. दिल्लीविरुद्धचा अंतिम सामना हा रोहित शर्माचा आयपीएलमधला द्विशतकी सामना ठरला आहे. महेंद्रसिंह धोनीनंतर २०० वा सामना खेळणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू ठरला आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार धोनीनेही यंदाच्या हंगामातच हा अनोखा विक्रम आपल्या नावे केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान नाणेफेक जिंकत दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. डेक्कन चार्जर्स संघाकडून आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रोहितने ३ वर्ष डेक्कनचं प्रतिनिधीत्व केलं. यानंतर २०११ साली मुंबई इंडियन्सने रोहितला आपल्या संघात घेतलं. यानंतर आपल्या नेतृत्वकौशल्याच्या आधारावर रोहितने मुंबई इंडियन्सला ४ विजेतेपद मिळवून दिली आहेत. त्यामुळे यंदाच्या अंतिम सामन्यात दिल्लीचं आव्हान मोडीत काढत रोहितचा संघ पुन्हा एकदा विजयी ठरतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.