IPL 2020 playoffs Qualifier 1 MI vs DC: दिल्लीविरूद्धच्या सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत मुंबई इंडियन्सने IPL कारकिर्दीत सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. इशान किशन (५५*), सूर्यकुमार यादव (५१) आणि हार्दिक पांड्या (३७*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने २०० धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीचं कंबरडं मोडलं. जसप्रीत बुमराहने १४ धावांत ४ बळी घेत संघाला ५७ धावांनी विजय मिळवून दिला. ट्रेंट बोल्टनेही ९ धावांत २ बळी टिपत विजयात मोलाचा वाटा उचलला.
बुमराहचा भेदक मारा
नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला. डी कॉक-सूर्यकुमार यादव जोडीने चांगली भागीदारी केली. क्विंटन डी कॉक ४० धावांवर झेलबाद झाला. त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. तर सूर्यकुमार यादव अर्धशतकानंतर लगेचच ५१ धावांवर माघारी परतला. कायरन पोलार्ड (०), कृणाल पांड्या (१३) देखील लवकर बाद झाले. त्यानंतर इशान किशन-हार्दिक पांड्या जोडीने तुफान फटकेबाजी करत मुंबईच्या संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. किशनने ३० चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या. हार्दिकने १४ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या.
किशनचं अप्रतिम अर्धशतक
पांड्याची तुफान फटकेबाजी
२०१ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकातच दिल्लीला दोन धक्के बसले. पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे दोघेही शून्यावर माघारी परतले. दमदार फॉर्मात असलेला शिखर धवनही शून्यावर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे दिल्लीची अवस्था शून्य धावांवर ३ गडी बाद अशी झाली. कर्णधार श्रेयस अय्यर (१२) आणि ऋषभ पंत (३) देखील स्वस्तात तंबूत परतले. त्यानंतर मार्कस स्टॉयनीस आणि अक्षर पटेल जोडीने काही काळ संघर्ष केला. स्टॉयनीसने लढाऊ वृत्ती दाखवत ४६ चेंडूत ६५ धावांची खेळी केली.
स्टॉयनीसची झुंझार खेळी
अक्षर पटेलनेही फलंदाजीत दम दाखवत ४२ धावांची जोरदार खेळी केली. पण अखेर त्यांना ५७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
IPL 2020 Playoffs: दिल्लीविरूद्धच्या सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत मुंबई इंडियन्सने IPL कारकिर्दीत सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. इशान किशन (५५*), सूर्यकुमार यादव (५१) आणि हार्दिक पांड्या (३७*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने २०० धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीचं कंबरडं मोडलं. जसप्रीत बुमराहने १४ धावांत ४ बळी घेत संघाला ५७ धावांनी विजय मिळवून दिला.
स्टॉयनीसची एकाकी झुंज संपुष्टात; दिल्ली संकटात
एकीकडे गडी बाद होताना मार्कस स्टॉयनीसने आपली उपयुक्तता सिद्ध करत ३६ चेंडूत अर्धशतक ठोकलं.
चांगली खेळी करण्याची अपेक्षा असताना ऋषभ पंत अवघ्या ३ धावा काढून बाद झाला.
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने घेतला झेल, दिल्लीचा संघ संकटात
दमदार फॉर्मात असलेला शिखर धवनही शून्यावर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे दिल्लीची अवस्था शून्य धावांवर ३ गडी बाद अशी झाली.
२०१ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकातच दिल्लीला दोन धक्के बसले. पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे दोघेही शून्यावर माघारी परतले.
दिल्लीविरूद्धच्या प्ले-ऑफ्सच्या पहिल्या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी तुफान धुलाई करत ५ बाद २०० धावांपर्यंत मजल मारली. सूर्यकुमार यादव (५१) आणि क्विंटन डी कॉक (४०) जोडीने संघाचा भक्कम पाया रचला. तर शेवटच्या टप्प्यात इशान किशन (नाबाद ५५) आणि हार्दिक पांड्या (नाबाद ३७) या जोडीने २३ चेंडूत ६० धावांची भागीदारी केली आणि दिल्लीला २०१ धावांचं आव्हान दिलं. अश्विनने चांगली गोलंदाजी करत ३ बळी टिपले.
धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात मोठा फटका खेळताना कृणाल पांड्यादेखील १० चेंडूत १३ धावा करून माघारी परतला.
संपूर्ण स्पर्धेत गोलंदाजांना कर्दनकाळ ठरलेला कायरन पोलार्ड आज मात्र शून्यावर बाद झाला.
सूर्यकुमार यादव आणि इशान किशन जोडीने संघाचा डाव सावरला. सूर्यकुमारने अर्धशतकदेखील ठोकलं पण अर्धशतकानंतर लगेचच ५१ धावांवर तो माघारी परतला.
दमदार फटकेबाजी करत असताना क्विंटन डी कॉक ४० धावांवर झेलबाद झाला. त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला.
रोहित स्वस्तात बाद झाला असला तरी डी कॉक-सूर्यकुमार यादव जोडीने फटकेबाजी सुरू ठेवत पाचव्या षटकात मुंबईचं अर्धशतक झळकावलं.
सामन्याच्या दुसऱ्याच षटकात आर अश्विनने मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याला त्याच्या पहिल्याच चेंडूवर पायचीत केलं.
प्रथम फलंदाजी करताना डावाच्या पहिल्याच षटकात सलामीवीर क्विंटन डी कॉकने ३ चौकार लगावले.
हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, ट्र्रेंट बोल्ट त्रिकुटाचं पुनरागमन
दिल्लीने संघात एकही बदल केलेला नाही.
गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या मुंबईविरूद्ध दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.