अप्रतिम लयीत असणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाला मोक्याच्या सामन्यात पराभूत करत दिल्लीने पहिल्यांदाच IPLच्या अंतिम फेरीत धडक मारली. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन याने ५० चेंडूत ७८ धावा करत संघाला १८९ धावांपर्यंत मजल मारून दिली. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना केन विल्यमसनने संघर्षपूर्ण अर्धशतक ठोकलं, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. मार्कस स्टॉयनीसने अष्टपैलू कामगिरी करत संघाला १७ धावांनी विजय मिळवून दिला. कगिसो रबाडाने लौकिकाला साजेशी गोलंदाजी करत ४ बळी टिपले. आता १० नोव्हेंबरला अंतिम सामन्यात दिल्लीपुढे मुंबईचे आव्हान असणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Highlights
अप्रतिम लयीत असणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाला मोक्याच्या सामन्यात पराभूत करत मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने IPLच्या पहिल्यावहिल्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.
६७ धावांची अप्रतिम खेळी करणारा केन विल्यमसन मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. त्याला स्टॉयनीसने माघारी धाडलं.
युवा अब्दुल समदच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी करत विल्यमसनचं अर्धशतक
सामन्यात हैदराबादचं आव्हान कायम
स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर षटकार खेचत विल्यमसनने संघाला पार करुन दिला १०० धावांचा टप्पा
जेसन होल्डर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी
११ धावांवर झाला बाद, प्रवीण दुबेने घेतला झेल
दिल्लीच्या गोलंदाजांचा संयमीपणे सामना करत दोन्ही फलंदाजांची आश्वासक खेळी
प्रियम गर्ग आणि मनिष पांडे या दोघांमध्ये चांगली भागीदारी होत असतानाच स्टॉयनीसने एका षटकात हैदराबादला दोन धक्के दिले. आधी प्रियम गर्ग १७ धावांवर त्रिफळाचीत झाला. तर शेवटच्या चेंडूवर मनिष पांडे २१ धावांवर झेलबाद झाला.
१९० धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर २ धावांवर त्रिफळाचीत झाला.
दिल्लीने धडाकेबाज फलंदाजी करत हैदराबादपुढे १९० धावांचे आव्हान ठेवले. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन याने ५० चेंडूत ७८ धावा कुटल्या. त्याने ६ चौकार आणि २ षटकार लगावले.
शिखर धवनने एक बाजू लावून धरत फटकेबाजी केली. ५० चेंडूत ७८ धावा काढून तो माघारी परतला.
धवनसोबत चांगली भागीदारी करताना धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात कर्णधार श्रेयस अय्यर माघारी परतला. त्याने २० चेंडूत २१ धावा केल्या.
शिखर धवनने फटकेबाजी सुरू करत २६ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकलं.
फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात मार्कस स्टॉयनीस ३७ धावांवर त्रिफळाचीत झाला. ५ चौकार आणि १ षटकार लगावल्यानंतर राशिदने त्याला माघारी धाडलं.
प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शिखर धवन आणि मार्कस स्टॉयनीस यांनी 'पॉवर-प्ले'च्या षटकांत तुफान फटकेबाजी करत ६५ धावा कुटल्या.
धवनसोबत सलामीला पाठवण्यात आलेल्या मार्कस स्टॉयनीसने हैदराबादच्या गोलंदाजांवर आक्रमण करत फटकेबाजीला सुरूवात केली. जेसन होल्डरच्या एका षटकात त्याने ३ चौकार आणि १ उत्तुंग षटकार खेचला.
मैदानात नाणेफेकीच्याच वेळी श्रेयस अय्यरच्या बाबतीत विचित्र प्रसंग घडला. नक्की काय घडलं पाहण्यासाठी क्लिक करा.
दिल्लीच्या संघात प्रविण दुबे आणि शिमरॉन हेटमायर यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. डॅनियल सॅम्स आणि पृथ्वी शॉ यांना संघाबाहेरचा रस्ता दाखण्यात आला आहे.
हैदराबादच्या संघाचा धडाकेबाज सलामीवीर वृद्धिमान साहा अद्यापही तंदुरूस्त नसल्याने त्याला संघात स्थान मिळालेले नाही. हैदराबादचा संघ गेल्या सामन्यातील संघाबरोबरच मैदानात उतरला आहे.
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने यावेळी बोलताना प्रथम गोलंदाजीच करणं पसंत असल्याचं सांगितलं.