IPL 2020: IPL 2020च्या शेवटच्या साखळी सामन्यात हैदराबादने मुंबईला १० गडी राखून पराभूत केले आणि ‘प्ले-ऑफ्स’मध्ये दिमाखात प्रवेश केला. या सामन्याअंती स्पर्धेला Top 4 संघ मिळाले. मुंबईने साखळी सामन्याअंती १८ गुणांसह अव्वलस्थान कायम राखलं. दिल्लीने १६ गुणांसह दुसरं स्थान पटकावलं. बंगळुरूच्या संघाने प्ले-ऑफ्समध्ये स्थान पटकावलं, पण हैदराबादची धावगती जास्त असल्याने त्यांना तिसरं स्थान मिळालं आणि बंगळुरूला चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं.
अशी असेल प्ले-ऑफ्सची लढाई
प्ले-ऑफ्सचे सर्व सामने भारतीय प्रमाणे वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सुरू होतील.
५ नोव्हेंबर, गुरूवार – पहिली पात्रता फेरी १ – मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स (दुबई)
६ नोव्हेंबर, शुक्रवार – बाद फेरी – सनरायझर्स हैदराबाद vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (अबु धाबी)
८ नोव्हेंबर, रविवार – दुसरी पात्रता फेरी – मुंबई-दिल्ली सामन्यातील पराभूत संघ vs हैदराबाद-बंगळुरू सामन्याचा विजेता (अबु धाबी)
१० नोव्हेंबर – अंतिम सामना – मुंबई दिल्ली सामन्याचा विजेता vs दुसऱ्या पात्रता फेरीतील विजेता (दुबई)
A look at the Road To The Final for #Dream11IPL 2020 pic.twitter.com/Zrz7Su7qa4
— IndianPremierLeague (@IPL) November 3, 2020
दरम्यान, साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात हैदराबादने मुंबईला १० गडी राखून पराभूत केले आणि ‘प्ले-ऑफ्स’मध्ये दिमाखात प्रवेश केला. कायरन पोलार्डने ४१ धावा करत मुंबईला १४९ धावांपर्यंत मजल मारून दिली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा या दोघांनी दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. वॉर्नरने नाबाद ८५ धावांची खेळी केली. तर वृद्धिमान साहाने नाबाद ५८ धावा करत त्याला चांगली साथ दिली.