IPL 2020 playoffs : यंदाच्या हंगामात प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होणारा मुंबईचा पहिला संघ आहे. सीएसकेचा संघ यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मुंबई क्वालिफाय झाल्यामुळे आता उर्वरित तीन स्थानासाठी सहा संघामध्ये चुरस सुरु आहे. त्यातच पंजाबच्या पराभवामुळे उर्वरित सर्वच संघाला प्ले ऑफमध्ये पोहचण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. पंजाबचा सर्वाधिक फायदा कोलकाता, राजस्थान आणि हैदराबाद या संघाला झाला आहे.
आयपीएलच्या १३ व्या हंगामात आतापर्यंत ५० सामने झाले आहेत. बाद फेरीतील फक्त सहा सामने बाकी आहेत. तरिही अद्याप अंतिम चार संघ कोणते हे स्पष्ट झालेलं नाही. मुंबई वगळता एकाही संघाचं क्वालिफायचं तिकिट पक्कं झालेलं नाही. अशातच सहा सामने, सहा संघ आणि तीन जागा… असं समिकरण राहिलं आहे. मुंबईचा संघ क्वालिफाय झाला असला तरिही उर्वरित सामने जिंकून अव्वल दोनमध्ये राहण्यासाठी मुंबईकर मैदानात उतरतील.
पंजाब, राजस्थान, कोलकाता या संघाचे १३ सामन्यात १२ गुण आहेत. प्ले ऑमध्ये पोहचण्यासाठी अखेरच्या सामन्यात विजय आवशक आहे. हैदराबाद, दिल्ली, आरसीबी आणि मुंबई यांचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हैदराबादला उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. तर दिल्ली आणि आरसीबीला एका सामन्यात विजय अनिवार्य आहे. अन्यथा नेट रन रेटच्या आधारावर अंतिम चारसाठी संघ क्वालिफाय होऊ शकतो.
उर्वरित सामने –
दिल्ली vs मुंबई
आरसीबी vs हैदराबाद
चेन्नई vs पंजाब
कोलकाता vs राजस्थान
दिल्ली vs आरसीबी
मुंबई vs हैदराबाद