करोना महामारीमध्येही बीसीसीआयनं यंदाच्या आयपीएल स्पर्धेचं यशस्वी आयोजन केलं आहे. युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या या यशस्वी हंगामासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि इतर पदाधिकाऱ्यांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. पण यामध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या ट्विटमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. या ट्विटमुळे रवी शास्त्री आणि सौरव गांगुली यांच्यात अलबेल असल्याच्या चर्चेला सोशल मीडियावर उधाण आलं आहे.
आयपीएलच्या १३ व्या हंगामातील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्लाचा पराभव करत पाचव्यांदा चषकावर नाव कोरलं आहे. दिल्लीच्या संघानं नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर १५७ धावांचं लक्ष ठेवलं होतं. मुंबईनं हे आवाहन १९ व्या षटकांत पार करत चषकावर नाव कोरलं. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मानं ६८ धावांची खेळी केली. आयपीएलच्या यशस्वी आयोजनाबद्दल क्रिकेट जगातामधून बीसीसीआयवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. रवी शास्त्री यांनीही ट्विट करत कौतुक केलं आहे. मात्र, यामध्ये त्यांनी सौरव गांगुलीचा उल्लेख न केल्याळे त्यांच्यातील वादावर सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
रवी शास्त्री यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलं? –
रवी यांनी आपल्या ट्विटमध्ये बीसीलीआय सचिव जय शाह, आयपीएल चेअरमन बृजेश पटेल, सीईओ हेमंग अमीन आणि मेडिकल स्टाफचं अभिनंदन केलं आहे. मात्र बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीच्या नावाचा उल्लेख टाळला आहे. आपल्या ट्विटमध्ये शास्त्री म्हणाले की, ” जय शाह, बृजेश पटेल, हेमंग अमीन आणि बीसीसीआयच्या मेडिकल स्टाफनं अशक्य गोष्ट शक्य केली आहे. आयपीएलच्या यशस्वी आयोजानाबद्दल हे सर्व कौतुकाचे पात्र आहेत. ”
Take a BOW @JayShah, Brijesh Patel, @hemangamin and the medical staff of the @BCCI for pulling off the impossible and making it a Dream @IPL #IPL2020 #IPLfinal pic.twitter.com/5rL6oqOLmC
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) November 10, 2020
रवी शास्त्री आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील वाद पहिल्यांदाच समोर आला नाही. याआधीही २०१६ मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वातील क्रिकेट सल्लागार समितीनं प्रक्षिक म्हणून अनिल कुंबळेची निवड केल्यानंतर दोघांमधील नात्यातील कटुता समोर आली होती. या समितीमध्ये सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मण यांचाही समावेश होता. शास्त्रीनं आरोप केल्यानंतर गांगुली म्हणाला होता की, ‘कोणताही एक सदस्या निवड करु शकत नाही. कमिटीनं निवड केली आहे.’