सलग तीन सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी करुन स्वतःतली गुणवत्ता सिद्ध केलेला महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड सध्या चांगलाच चर्चेत आहे. पंजाबविरुद्ध अखेरचा सामना खेळत असताना ऋतुराजने नाबाद ६२ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. चेन्नई सुपरकिंग्जचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं असलं तरीही ऋतुराजने गेल्या ३ सामन्यांत सलग अर्धशतकी खेळी करत आपल्यातली चमक दाखवून दिली. या खेळीनंतर सर्वच स्तरातून त्याचं कौतुक होत आहे. चेन्नईचा अनुभवी फलंदाज फाफ डु-प्लेसिसने ऋतुराजमध्ये तरुणपणातल्या विराट कोहलीच भास होतो असं म्हणत त्याचं कौतुक केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अवश्य वाचा – IPL 2020 : पहिल्यापासून ऋतुराजला संधी का दिली नाही?? धोनी म्हणतो…

“हा हंगाम आमच्यासाठी खरंच खूप निराशाजनक होता, परंतू अखेरचे ३ सामने आम्ही जिंकले याच थोडं समाधान आहे. ऋतुराजमध्ये मला तरुणपणातल्या विराट कोहलीच भास होतो. मला त्याची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे तो लगेच दडपण घेत नाही, सामना करतो. कोणत्याही तरुण खेळाडूमध्ये तुम्ही अशा प्रकारचे गुण शोधत असता. यातून त्यांना पुढे संधी मिळेल की नाही हे ठरतं.” सामना संपल्यानंतर डु-प्लेसिस post match presentation मध्ये बोलत होता.

अवश्य वाचा – IPL 2020 : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा विक्रम, सलग तिसऱ्या सामन्यात झळकावलं अर्धशतक

पंजाबविरुद्ध सामन्यातही ऋतुराज गायकवाडने आश्वासक खेळी केली. विजयासाठी मिळालेल्या १५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने चांगली सुरुवात केली. डु-प्लेसिस आणि गायकवाड जोडीने पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. डु-प्लेसिस माघारी परतल्यानंतर गायकवाडने आश्वासक फटकेबाजी करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. ४९ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ऋतुराजने नाबाद ६२ धावा केल्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : अब तुम्हारे हवाले…आगामी हंगामात धोनीने दिले मोठ्या बदलाचे संकेत