आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई आणि दिल्ली आमने-सामने असून लढत सुरु झाली आहे. दिल्लीसमोर चार वेळा चॅम्पिअन ठरलेल्या मुंबईचं आव्हान आहे. दरम्यान दिल्लीकडून खेळताना शिखऱ धवनच्या नावे एक अनोखा विक्रम झाला आहे. अंतिम सामन्यात खेळण्याची शिखर धवनची ही पहिलीच वेळ नसून याआधी त्याने तीन वेगवेगळ्या संघाकडून अंतिम सामना खेळाल आहे. आयपीएलचा अंतिम सामना खेळण्याची ही शिखर धवनची चौथी वेळ आहे.
सध्याच्या आयपीएलमध्ये दोन शतकं ठोकणारा शिखर धवन एकमेव खेळाडू आहे. डावखुऱ्या शिखर धवनने याआधी २०१० मध्ये मुंबई इंडियन्स, हैदराबादकडून २०१६, २०१८ मद्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे. पण यापैकी फक्त २०१६ मध्ये शिखर धवनला विजयी संघाचा भाग होण्याची संधी मिळाली होती.
शिखऱ व्यतिरिक्त हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाचा शेन वॉट्सन आणि भारताचा माजी गोलंदाज युसूफ पठाणच्या नावे आहेत. शेन वॉट्सन राजस्थान रॉयल्स (२००८), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (२०१६)आणि चेन्नई सुपरकिंग्जकडून (२०१८) आयपीएलचा अंतिम सामना खेळला होता. दुसरीकडे युसूफ पठाणने राजस्थान रॉयल्स (२००८), कोलकाता नाईट रायडर्स (२०१२, २०१४)आणि सनरायजर्स हैदराबादकडून (२०१८) अंतिम सामना खेळला आहे.
दरम्यान रोहित शर्मा, पोलार्ड आणि रवीचंद्रन अश्वीन सहाव्यांदा आयपीएलचा अंतिम सामना खेळत आहेत. अश्विनने याआधीचे पाचही अंतिम सामने चेन्नईकडून खेळले असून पोलार्ड सर्वच्या सर्व पाच सामने मुंबईकडून खेळले आहेत. तर रोहित शर्माने चार सामने मुंबईसाठी खेळले असून एक सामना २००८ मध्ये डेक्कन चार्जरकडून खेळला होता.