IPL 2020 : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारताबाहेर घेण्यात आलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामाची आज अंतिम लढत आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. मुंबई इंडियन्सने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी मजल मारली आहे तर दिल्ली पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहचली आहे. मुंबईची अंतिम फेरीत पोहचण्याची ही सहावी वेळ आहे. अंतिम फेरीत आतापर्यंत मुंबईला फक्त एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर चार वेळा मुंबईनं आयपीएल चषकावर नाव कोरलं आहे.
आयपीएलमधील अंतिम सामने खेळण्याच्या मुंबईकडे मोठा अनुभव असला तरीही दबाव राहणार आहे. आतापर्यंत झालेल्या १२ आयपीएल फायनलमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला आठवेळा जेतेपद पटकावता आलं आहेत. तर फक्त चार वेळा धावांचा पाठलाग करण्यात अंतिम सामन्यात यश आलं आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. २००८ पासून २०१९ या १२ वर्षात आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या निकालावर एक नजर मारूयात…
२००८ – धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा विजय.
राजस्थानने चेन्नईचा तीन विकेटनं पराभव केला होता.
२००९ – प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय.
डेक्कन चार्जर्सनं आरसीबीचा सहा धावांनी पराभव केला होता.
२०१० – प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय.
चेन्नईनं मुंबईचा २२ धावांनी पराभव केला होता.
२०११- प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय.
चेन्नईनं आरसीबीचा ५८ धावांनी पराभव केला होता
२०१२ – धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा विजय.
कोलकातानं चेन्नईचा पाच विकेटनं पराभव केला होता.
२०१३ – प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय.
मुंबईनं चेन्नईचा २३ धावांनी पराभव केला होता.
२०१४ – धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा विजय.
कोलकातानं पंजाबचा तीन विकेटनं पराभव केला होता.
२०१५ – प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय.
मुंबईनं चेन्नईचा ४१ धावांनी पराभव केला होता.
२०१६ – प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय.
हैदराबाद संघानं आरसीबीचा ८ धावांनी पराभव केला होता.
२०१७ – प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय.
रोमांचक सामन्यात मुंबईचा पुण्यावर एक धावांनी विजय
२०१८ – धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा विजय.
चेन्नईनं हैदराबाद संघाचा ८ विकेटनं पराभव केला होता.
२०१९ – प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय.
रोमांचक सामन्यात मुंबईनं चेन्नईवर एका धावेनं विजय मिळवला.