IPL 2020 MI vs DC: “गौर से देखो इस चेहरे को! तमाम दर्शको के बीच मे बैठा ये वही चेहरा है जिसके वजह से मुंबई इंडियन्स एक रनसे जित गयी. कहते है बुढो की, बच्चो की भगवान जल्दी सुन लेता है… आयपीएल की फायनल मैच में पुणे की टीमने मैच लगभग जीत ही लिया था… पर इनकी दुवा रंग लायी और मुंबईने हारा हुआ मैच जीत लिया…”, अशी कॉमेंट्री IPL 2017च्या अंतिम सामन्यात झाली आणि एका महिलेचा हात जोडून स्तोत्र म्हणणारा फोटो तुफान व्हायरल झाला. या आजी नक्की कोण हे त्यावेळी नेटिझन्सना माहिती नव्हतं. पण नंतर त्या आजीबाईंची ओळख पटली.
मुंबईच्या विजयासाठी प्रार्थना करणाऱ्या त्या आजीबाई म्हणजे मुंबई इंडियन्सच्या मालकीण असलेल्या नीता अंबानी यांची आई पूर्णिमा दलाल. २०१७ला त्यांचा फोटो खूपच व्हायरल झाला होता. मुंबईने त्यावेळी शेवटच्या चेंडूवर एका धावेने सामना जिंकला होता. त्यामुळे नेटिझन्सने मुंबईच्या विजयाचं श्रेय त्या आजीबाईंनाच देऊन टाकलं होतं. पण २०१७च्या आठवणी आता पुन्हा नव्याने जाग्या होण्याचं कारण म्हणजे त्या आजीबाईंची स्टेडियममध्ये लागलेली हजेरी… मुंबई – दिल्ली प्लेऑफ्सच्या पहिल्या सामन्यात त्या आजीबाई पुन्हा एकदा दिसल्या.
IPL 2020 सध्या दुबईत सुरू आहे. तेथे होणाऱ्या सामन्यात मोजक्या लोकांनाच प्रवेश आहे. मात्र मुंबईसाठी ‘लकी चार्म’ ठरलेल्या पूर्णिमा दलाल यांनी VIP पाहुण्यांमध्ये हजेरी लावली. २०१७च्या अंतिम सामन्यात स्टेडियममध्ये त्यांनी हजेरी लावली आणि मुंबईने सामना जिंकला. आता यंदाही हाच योगायोग जुळून येतो का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.