आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल अखेरीस वाजलेलं आहे. करोनाचा धोका लक्षात घेता यंदाच्या IPLहंगामाचे आयोजन भारताबाहेर UAEमध्ये करण्यात आले आहे. अबु धाबी, दुबई आणि शारजा अशा तीन ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान आयपीएलचा ‘रनसंग्राम’ होणार आहे. मुंबई संघानं आतापर्यंत २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ असे चार वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना होण्याची शक्यता आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मुंबईचा संघ जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. मुंबईच्या चमूत ७ फलंदाज, ९ गोलंदाज, ३ विकेट किपर आणि पाच अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. पाहूयात मुंबईच्या संघातील शिलेदार….
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in