आयपीएलचा तेरावा हंगाम नुकताच संपुष्टात आला…अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत विजेतेपदावर मोहर उमटवली. मुंबईचा अपवाद वगळता इतर सर्व संघांची कामगिरी यंदाच्या हंगामात संमिश्र स्वरुपाची राहिली. दिनेश कार्तिक आणि नंतर ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणारा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ यंदा प्ले-ऑफमधून बाहेर फेकला गेला. नेट रनरेटमुळे KKR चं प्ले-ऑफचं स्वप्न भंगलं. KKR च्या कामगिरीचं विश्लेषण करताना संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीरने सूर्यकुमार यादवला संघात कायम न राखता मुंबईकडे देणं ही KKR ची सर्वात मोठी चूक असल्याचं म्हटलं आहे.

“सूर्यकुमार यादवसारख्या गुणवान खेळाडूंना तुम्ही असचं सोडून देऊ शकत नाही. त्याला संघात कायम न राखण्याचा निर्णय घेत KKR ने सर्वात मोठी चूक केली असं माझं मत आहे. एखादा खेळाडू तुमच्या संघात ४ वर्ष खेळतोय…त्याच्या म्हणाव्या तशा धावा होत नाही कारण त्याला त्याच्या जागेवर खेळण्याची संधी मिळत नाही. KKR चा संघ सूर्यकुमारलच्या भोवती एक चांगला संघ तयार करु शकला असता. मी संघा सोडला त्यावेळी तो उप-कर्णधार होता.” ESPNCricinfo शी बोलत असताना सूर्यकुमारने आपलं मत मांडलं.

मुंबई इंडियन्सकडून खेळायला सुरुवात केल्यानंतर सूर्यकुमार यादवने नेहमी आपली छाप पाडली आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमारने यंदाच्या हंगामातही संघाला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. RCB विरुद्ध सामन्यात संघ संकटात सापडलेला असताना त्याने केलेली खेळी हा चर्चेचा विषय ठरली होती.

अवश्य वाचा – IPL 2020 : राशिद खानवर होती मुंबई इंडियन्सची नजर, दोन वर्षांपूर्वी हैदराबादकडे केली होती मागणी

Story img Loader