IPL 2020 Playoffs च्या दुसऱ्या सामन्यात बंगळुरूच्या संघाविरूद्ध हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूच्या संघात आरोन फिंचचा समावेश असतानाही विराट कोहलीने देवदत्त पडीकलसोबत सलामीला येणं पसंत केलं. बंगळुरूच्या कर्णधाराचा हा निर्णय संघाला चांगलाच महागात पडला. डावाच्या दुसऱ्याच षटकात विराट कोहलीला जेसन होल्डरने माघारी धाडलं. त्यानंतर देवदत्त पडीकलही चौथ्या षटकात माघारी परतला, पण ऑरोन फिंचने संघर्षपूर्ण खेळी करत एक पराक्रम केला.

फिंचने एबी डीव्हिलियर्ससोबत ४१ चेंडूत ४१ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. राशिद खानच्या फिरकीचा समाचार घेताना फिंचने उत्तुंग असा षटकार लगावला. याच षटकारासोबत फिंचने IPL कारकिर्दीत २ हजार धावांचा टप्पा गाठला. परंतु त्यानंतर मोठी धावसंख्या उभारणं फिंचला शक्य झालं नाही. ३० चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार लगावत तो ३२ धावांवर बाद झाला.

त्यानंतर एबी डीव्हिलियर्सने एकाकी झुंज देत संघाला शंभरी गाठून दिली. डीव्हिलियर्सने दमदार अर्धशतक ठोकलं.