जेसन होल्डर, टी. नटराजन आणि इतर गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे Playoffs च्या सामन्यात RCB चा संघ फक्त १३१ धावांपर्यंत मजल मारु शकला. एबी डिव्हिलियर्सचा अपवाद वगळता RCB चा एकही फलंदाज हैदराबादच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. डिव्हीलियर्सने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. हैदराबादकडून जेसन होल्डरने ३, टी. नटराजनने २ तर शाहबाज नदीमने १ बळी घेतला.

१३२ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना मोहम्मह सिराजने पहिल्याच षटकात सलामीवीर गोस्वामीला माघारी धाडलं. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडे यांच्या भागीदारी होत असतानाच वॉर्नरला बाद ठरवण्यात आले. चेंडू वॉर्नरच्या ग्लोव्ह्ज आणि मांडीच्या अतिशय जवळून गेला. मैदानावरील पंचांनी वॉर्नरला नाबाद ठरवलं होतं. पण DRS च्या वापरानंतर तिसऱ्या पंचांनी वॉर्नरला तंबूचा रस्ता दाखवला. असे असूनही वॉर्नर नक्की बाद होता की नव्हता यावरून बऱ्याच चर्चा रंगल्या.

OUT की NOT OUT? पाहा व्हिडीओ…

दरम्यान, नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम गोलंदाजी निवडली. सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडीकल दोघेही सलामीला येऊन स्वस्तात बाद झाले. फिंच-डीव्हिलियर्स जोडीने डाव सावरत ४१ धावांची भागीदारी केली. फिंच ३२ धावांवर बाद झाल्यानंतरही डीव्हिलियर्सने एक बाजू लावून धरली. त्याने ४३ चेंडूत ५६ धावा केल्या. पण इतर फलंदाजांनी मात्र साफ निराशा केली.

Story img Loader