IPL 2020 Playoffs Qualifier 2 DC vs SRH: दिल्ली आणि हैदराबाद या दोन तुल्यबळ संघाच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धवनसोबत सलामीला पाठवण्यात आलेल्या मार्कस स्टॉयनीसने हैदराबादच्या गोलंदाजांवर आक्रमण करत फटकेबाजीला सुरूवात केली. सलामीवीर शिखर धवन आणि मार्कस स्टॉयनीस यांनी ‘पॉवर-प्ले’च्या षटकांत ६५ धावा कुटल्या. स्टॉयनीसने दमदार सुरूवात केली होती, पण त्याच्या विकेटची जास्त चर्चा झाली.

मार्कस स्टॉयनीस जोरदार फटकेबाजी करत होता. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण राशिदच्या फिरकीपुढे त्याला काहीच समजलं नाही. राशिदच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्याच्या उद्देशाने स्टॉयनीसने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण त्याला काहीही कळण्याआधी तो त्रिफळाचीत झाला.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, मैदानात नाणेफेकीच्याच वेळी श्रेयस अय्यरच्या बाबतीत विचित्र प्रसंग घडला. अँकरने श्रेयसला संघात काही बदल आहेत का असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर बोलताना श्रेयसने पृथ्वी शॉ च्या जागी प्रविण दुबेला संघात स्थान दिल्याचं सांगितलं. पण काही केल्या त्याला दुसरा बदलेलला खेळाडूच आठवेना… काही कालावधी नंतर त्याला अचानक आठवलं आणि मग त्याने सॅम्सच्या जागी शिमरॉन हेटमायरला संधी दिल्याचं सांगितलं

Story img Loader