भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आज ३३ व्या वर्षात पदार्पण केलं. परंतु कोविडच्या धोक्यामुळे बहुसंख्य चाहत्यांच्या गर्दीत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणं मात्र विराटला शक्य झालं नाही. सध्या सुरू असलेलं IPL आणि कोविडबाबत BCCIची मार्गदर्शक तत्वे यांच्यामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच किंग कोहलीचा वाढदिवस साजरा झाला. पण वाढदिवस कोहलीचा असल्याने बंगळुरू व्यवस्थापनाने मात्र जंगी सेलिब्रेशन केलं. दुबईमध्ये आपली पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत विराटने बोटीवर वाढदिवस साजरा केला.

बंगळरू संघातील सारे खेळाडू आणि इतर कर्मचारी वर्ग तसेच त्यांचे दुबईत असलेले जोडीदार साऱ्यांनी विराटला रात्री १२ वाजता बोटीवर झकास सर्प्राइज दिलं. विराट आणि अनुष्का दोघांना एका सोफ्यावर बसवून त्यानंतर एक स्पेशल गिफ्ट दाखवण्यात आलं. बंगळुरू संघाच्या सर्व सदस्यांनी विराटला शुभेच्छा दिल्याचा एक व्हिडीओ यावेळी दाखवण्यात आला. तसेच झकासपैकी केक कापण्यात आला. इतकंच नव्हे तर नंतर विराटच्या चेहऱ्यालाही केकदेखील फासण्यात आला.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, बंगळुरूचा संघ सलग चार सामने पराभूत होऊनही प्ले-ऑफ्सच्या फेरीत दाखल झाला आहे. शुक्रवारी बाद फेरीत त्यांचा सामना हैदराबादशी होणार आहे.

 

Story img Loader