आयपीएलच्या तेराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. शारजाच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सामन्यात विराट कोहली नाणेफेकीसाठी मैदानावर उतरला. विराट कोहलीचा RCB संघाकडून हा २०० वा सामना असणार आहे. एका संघाकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू हा बहुमान विराटच्या नावे जमा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराटने RCB कडून आयपीएलमध्ये १८५ तर चॅम्पिअन्स लिगमध्ये १५ सामने खेळले आहेत. २००८ मध्ये एकदा आणि २०१७ मध्ये तीन सामन्यांत विराट RCB कडून खेळला नव्हता.

दरम्यान नाणेफेक जिंकत विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विजयी सूर गवसलेल्या विराटने पंजाबविरुद्ध सामन्यात संघामध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. २००८ साली कोलकाता नाईट रायडर्सकडून विराट आपला पहिला सामना खेळला होता. यानंतर मुंबई इंडियन्सविरुद्ध विराट RCB कडून शंभरावा सामना खेळला होता. तर पंजाबविरुद्धचा सामना हा त्याचा २०० वा सामना ठरणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli to played his 200th ipl match for rcb psd
Show comments