आयपीएलच्या तेराव्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होते आहे. अबु धाबीत गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. एकीकडे आयपीएलमध्ये मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली यासारखे संघ नेहमी विजेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. तर दुसरीकडे विराट कोहलीच्या RCB संघाला आतापर्यंत नेहमी अपयशाचा सामना करावा लागला आहे. RCB सोबत दिल्ली आणि पंजाब या संघांनीही आतापर्यंत एकदाही स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं नाही. RCB चा विचार करायला गेला तर संघ हा विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्स या दोन खेळाडूंवरच अवलंबून असतो असं म्हटलं जातं. यासाठी संघ प्रशासनाने तेराव्या हंगामात काही नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे यंदा RCB चं काय होणार हा प्रश्न सर्वांसमोर आहे…याचाच घेतलेला आढावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा