Rohit Sharma IPL 2023: मुंबई इंडियन्स आयपीएल २०२३ मध्ये त्यांचा शेवटचा लीग सामना वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळत आहे. दरम्यान, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक चाहता त्याला जाहीरपणे किस मागताना दिसत आहे. चाहत्यांची ही मागणी पाहून हिटमॅनला पूर्ण धक्का बसला आहे आणि त्याला समजू शकत नाही की त्याच्याबाबत नेमकं काय होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शर्मा हा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला त्याची क्रेझ स्पष्टपणे पाहायला मिळाली. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा चाहत्यांसमोरून जाताना दिसत आहे आणि त्याचदरम्यान एक चाहता त्याच्याकडे किसची मागणी करताना दिसत आहे. रोहित शर्माच्या गालावर चुंबन घेण्यासाठी चाहत्याने हातवारे केले. हे कृत्य पाहून रोहित शर्मा पूर्णपणे हैराण झाला आहे. क्षणभरासाठी नेमकं काय झालं हे त्याला सुचलच नाही. त्यातही पुरुषाने रोहित शर्माच्या प्रेमापोटी ही मागणी केली म्हणून थोडा ओशाळला.

यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्स चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आयपीएल २०२३ मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसली आहे. संघाने एकूण १३ सामने खेळले आहेत (हैदराबाद विरुद्ध १४ वा सामना खेळत आहे). या सामन्यांमध्ये मुंबईने ७ वेळा विजय मिळवला असून ६ वेळा पराभव केला आहे. मुंबई १४ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, आयपीएल २०२२ मध्ये म्हणजेच गेल्या हंगामात, संघ गुणतालिकेत १०व्या किंवा शेवटच्या स्थानावर होता.

हेही वाचा: R Ashwin: अ‍ॅश अण्णा की जय हो! राजस्थानला अश्विनचा खास धडा, “प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी गुजराती जेवण आणि तेलगु भाषा…”

सामन्यात काय झाले?

आयपीएल २०२३च्या ६९व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबईसाठी हा बाद फेरीचा सामना आहे. जर संघ हरला तर तो स्पर्धेतून बाहेर जाईल. त्याचवेळी, जिंकल्यानंतरही संघाचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार नाही. त्याला अजूनही आरसीबी विरुद्ध गुजरात सामन्यात टिकून राहावे लागेल. त्याचवेळी हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी त्यांना सन्मानाने स्पर्धेतून बाहेर पडायचे आहे. नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २०० धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl2023 a fan requested rohit sharma to kiss watch viral video on social media avw
Show comments