रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या १२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सचा संघ त्यांच्याच घरच्या मैदानावर १९.५ षटकांत १०८ धावांवर गारद झाला. १८ धावांच्या विजयानंतर आरसीबी गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर पोहोचला. त्याचे ९ सामन्यांत ५ विजयांसह १० गुण आहेत. तर लखनऊ तिसऱ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल२०२३ मधील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव केला आहे. कोहलीने लखनऊकडून मागील पराभवाचा बदलाही घेतला.

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री यांनी फॅफ डू प्लेसिसच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आणि त्याला आरसीबीचा सर्वोत्तम खेळाडू म्हटले. शास्त्री म्हणाले, लखनऊची खेळपट्टी आणि परिस्थिती वाचून फॅफने आपल्या अनुभवाचा उत्तम उपयोग केला. संघाच्या गोलंदाजांचा योग्य वापर करत त्याने इतक्या कमी धावसंख्येमध्येही विजय मिळवला.

हेही वाचा: IPL2023: “मला अजूनही त्या गोष्टीची लाज…” विराट-गौतम वाद सुरु असताना हरभजनला झाली “त्या” खेळाडूची आठवण, पाहा Video

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, “फाफ डू प्लेसिस खेळपट्टी पाहून आपली योजना अधिक चांगल्या प्रकारे राबवतो. जेव्हा धावा करणे कठीण होते तेव्हा तो फलंदाजीतील नियंत्रण गमावत नाही तो एक बाजू घट्ट पकडून धरतो.” शास्त्री पुढे म्हणाले, “फाफने यापूर्वी सीएसकेकडून खेळताना असेच केले आहे आणि आता तो आरसीबीसाठीही तेच करत आहे.”

कोहली-गंभीर वादावर रवी शास्त्रींचे सूचक विधान

लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या वादावर रवी शास्त्री यांनी भाष्य केलं आहे. “ हे सर्व एका दिवसात होत नाही, जे पेराल ते उगवेल या न्यायाने तुम्ही जसं वागाल तसच समोरचा व्यक्ती वागत असतो. चिन्नास्वामीवर झालेल्या सामन्यात आवेश खानने सामना जिंकल्यानंतर जी प्रतिक्रिया दिली तशीच प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली. खरं तर दोन्ही सामन्यात जे झालं ते चुकीचं होत. सामना जिंकला बस्स तिथेच तुमचं शत्रुत्व संपलं पाहिजे. नक्की काय झाले मला माहिती नाही पण खेळात असे होतच असते.”

हेही वाचा: IPL 2023: विराट-नवीनच्या खळ्ळ खट्याक मागचा सूत्रधार मोहम्मद सिराज? Video पाहा आणि तुम्हीच ठरवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुन्हा टॉप स्कोअरर बनला

फाफ डू प्लेसिसच्या बरगडीच्या दुखापतीमुळे विराट कोहलीने गेल्या अनेक सामन्यांमध्ये बंगळुरूचे नेतृत्व केले. लखनऊ विरुद्धच्या सामन्यात फाफच्या हातात पुन्हा कमान आली.या सामन्यात सलामीवीराने ४० चेंडूत ४४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यासह त्याने यशस्वी जैस्वालला मागे टाकत ऑरेंज कॅपही परत घेतली. आयपीएलच्या चालू हंगामात फाफ डू प्लेसिस सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने ९ सामन्यात ५ अर्धशतकांसह ४६६ धावा केल्या आहेत. मॅचनंतर विराट कोहली आणि लखनऊचा गोलंदाज नवीन-उल-हक यांच्यात बाचाबाची झाली. यावर बीसीसीआयने कारवाई करत विराट आणि गंभीरला सामना फीच्या १००% तर नवीन-उल-हकला ५०% दंड ठोठावण्यात आला आहे.