R Ashwin vs Ajinkya Rahane: जेव्हा जेव्हा नॉन-स्ट्राइक एंडवर धावबाद होण्याची वेळ येते तेव्हा रविचंद्रन अश्विनचा उल्लेख प्रथम केला जातो. काही दिवसांपूर्वी आरसीबी आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात या प्रकरणावरुन बराच वाद झाला होता. आता बुधवारी रात्री चेन्नई आणि राजस्थानच्या सामन्यातही असाच काहीसा प्रकार घडला. सहाव्या षटकात रविचंद्रन अश्विन पहिल्यांदा गोलंदाजी करायला आला. अजिंक्य रहाणे आघाडीच्या स्ट्राईकवर तर डेव्हॉन कॉनवे नॉन स्ट्राईक एंडवर उपस्थित होता.
षटकाचा दुसरा चेंडू टाकत असताना अश्विन अचानक थांबला आणि चेंडू टाकला नाही. अश्विन नॉन-स्ट्रायकरच्या शेवटी फलंदाजाला सावध करण्यासाठी अशा युक्त्या करतो, परंतु यावेळी त्याचा हेतू पूर्णपणे वेगळा होता. त्याला रहाणेचा प्लॅन पाहायचा होता. पुढच्या बॉलसाठी अश्विन पुन्हा रनअपवर गेला, पण आता चकित करण्याची पाळी फलंदाजाची होती, अश्विनने चेंडू सोडण्याआधीच रहाणे स्टंप सोडून बाजूला गेला. यावेळी संपूर्ण स्टेडियम चाहत्यांच्या जल्लोषाने दणाणून गेला.
षटकार मारून घेतला मग बदला
पुढच्या चेंडूवर अजिंक्य रहाणेने रविचंद्रन अश्विनचा दमदार चेंडूचा आदर करत बचाव केला, पण पुढच्याच चेंडूवर पुढे येत सीमारेषेच्या पलीकडे षटकार ठोकला. अश्निनने अप्रतिम गोलंदाजी केली, परंतु रहाणेने आपला फलंदाजीतील क्लास दाखवला आणि फुटवर्कचा वापर करून षटकार मारला म्हणून बॅटचा संपर्क उत्कृष्ट होता. मात्र या अपमानाचा बदला अश्विनने १०व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर त्याने अजिंक्य रहाणेला एलबीडब्ल्यू आऊट केले. रहाणेने अश्विनची शिकार करण्याची ही पाचवी वेळ होती.
शेवटच्या चेंडूवर सीएसकेचा पराभव झाला
रॉयल्सच्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने चांगली सुरुवात करून दिली. मधल्या फळीतील अपयशानंतर महेंद्रसिंग धोनी (१७ चेंडूत नाबाद ३२, त्यात एक चौकार, तीन षटकार) आणि रवींद्र जडेजा (१५ चेंडूत नाबाद २५, एक चौकार, दोन षटकार) यांनी ५९ धावांची नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. शेवटच्या षटकात विजयासाठी २१ धावा आणि शेवटच्या चेंडूवर पाच धावा हव्या होत्या, पण महेंद्रसिंग धोनीला आवश्यक षटकार मारता आला नाही. संदीप शर्माने शानदार चेंडू टाकत राजस्थानला विजय मिळवून दिला.