इंडियन प्रीमियर लीग २०२३च्या ६०व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा ११२ धावांनी पराभव केला. राजस्थान रॉयल्सने या सामन्यात अत्यंत निराशाजनक फलंदाजी केली आणि संपूर्ण संघ केवळ ५९ धावांवर ऑलआऊट झाला. पराभवानंतर बंगळुरू इंडियन प्रीमियर लीग २०२३च्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आला आहे, संजू सॅमसनचा संघ आता ६व्या स्थानावर घसरला आहे. मात्र, यासामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेल्या देवदत्त पडिकलची विकेट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
हा सामना जिंकणे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खूप महत्त्वाचे होते आणि त्यांनी तो जिंकला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांत ५ गडी गमावून १७१ धावा केल्या. संघासाठी कर्णधार फाफ डू प्लेसिसने ४४ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५५ धावांची खेळी केली, तर ग्लेन मॅक्सवेलने ३३ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५४ धावांची खेळी केली. अनुज रावतने शेवटच्या षटकात काही आक्रमक फटके मारत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.
१७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात आरसीबीपेक्षाही खराब झाली. भारताचा धडाकेबाज फलंदाज यशस्वी जैस्वाल मोहम्मद सिराजला विकेट देऊन तंबूत परतला. जॉस बटलरही फारशी चमक दाखवू शकला नाही. कर्णधार संजू सॅमसनही मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आणि केवळ ४ धावा करून बाद झाला. जो रूटने १० धावांची खेळी खेळली. पाचव्या षटकात मिचेल ब्रेसवेलला गोलंदाजीला आणले गेले अन् इम्पॅक्ट प्लेअर देवदत्त पडिकलने ४ धावा करून सिराजच्या हातात झेल दिला, परंतु त्याच्या हातातील चेंडू जमिनिवर टप्पा पडलेला दिसत आहे पण, सिराजची बोटं चेंडू खाली असल्याने तिसऱ्या अंपायरने पडिकलला बाद दिले. मात्र त्याची बोटे आणि चेंडू दोन्हीही जमिनीला टेकल्याचे दिसत आहे.
आयपीएलचे प्ले ऑफमध्ये राजस्थान पोहचणार का?
राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद हैदराबाद संघांची प्ले-ऑफ्समध्ये पात्र होण्याची शक्यता कमी आहेत. तिन्ही संघांना आपले उर्वरित सामने जिंकून १४ गुणांवर जाता येईल मात्र त्यानंतरही मुंबई, लखनऊ, आरसीबी व पंजाब संघाचे पराभव होणे आवश्यक असेल. हे सर्व होऊनही नेट रनरेटवर अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे यांची पुढे जाण्याची शक्यता कमीच आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतुन अधिकृतपणे याआधीच बाहेर गेला आहे.