IPL 2023, Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Match Updates: इंडियन प्रीमियर लीगमध्ये चुरस दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्येक सामन्यात कुठलतरी षटकार-चौकार किंवा अशी विकेट असते, ज्याची नंतर चर्चा होणार हे नक्की. शिमरॉन हेटमायरने ११ मे रोजी ईडन गार्डन्सवर असाच पराक्रम केला. राजस्थान रॉयल्सच्या या कॅरेबियन खेळाडूने यजमान कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आपल्या चपळाईने सर्वांची मने जिंकली. त्याने जे केले ते चाहत्यांनी पाहिले आणि त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आता या त्याच्या शानदार झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये एकापेक्षा जास्त आश्चर्यकारक झेल पाहायला मिळाले. गुरुवारी (११ मे) ईडन गार्डन्सच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यातही एक आश्चर्यकारक झेल पाहायला मिळाला. कॅरेबियन स्टार शिमरॉन हेटमायरने हा झेल टिपला. हेटमायरने सीमारेषेवर जेसन रॉयचा अप्रतिम झेल घेत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

१६व्या मोसमातील ५६व्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. केकेआरचे सलामीवीर जेसन रॉय आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी आपल्या संघाला जलद सुरुवात करून दिली. त्यानंतर ही भागीदारी शिमरॉन हेटमायरने तिसऱ्याच षटकात एका हाताने सीमारेषेवर आश्चर्यकारक झेल घेत सर्वांना अचंबित केले. एका हाताने पकडलेला हा झेल आयपीएलच्या या मोसमातील सर्वोत्तम झेल मानला जात आहे.

हेही वाचा: KKR vs RR Match Updates: युजवेंद्र चहलची भेदक गोलंदाजी! कोलकाताचं राजस्थानसमोर १५० धावांचे आव्हान

कसा पकडला होता झेल?

वास्तविक, डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पहिल्या डावातील तिसरे षटक टाकत होता. त्याने दुसरा चेंडू स्लोअर टाकला. फॉर्ममध्ये असलेला इंग्लिश सलामीवीर जेसन रॉयने राईट आर्म कोनचा फायदा घेण्यासाठी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फ्लिक केले. शॉट चांगला होता, तो षटकार असेल असे वाटत होते, परंतु नंतर सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेला हेटमायर धावत आला आणि झेल घेण्यासाठी सर्व शक्तीनिशी उंची उडी मारली. हे सर्व काही सीमेवरच घडले. झेल घेतल्यानंतर वेस्ट इंडिजच्या धडाकेबाज खेळाडूने स्वत:ला रेषेला चिकटण्यापासून वाचवले आणि समतोल राखत आपली दमदार मेहनत व्यर्थ जाऊ दिली नाही. जेसन रॉयने आठ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने १० धावा केल्या.

विजयासाठी राजस्थान रॉयल्स केवळ १५० धावांचे आव्हान

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करताना कोलकाता नाईट रायडर्सला २० षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात १४९ धावांवर रोखले. राजस्थानला विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य मिळाले होते. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्टने दोन बळी घेतले. संदीप शर्मा आणि के.एम. आसिफ यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळाले.

Story img Loader