Mohammad Siraj, IPL2023: मोहम्मद सिराजच्या मेहनतीचे आता नक्कीच फळ मिळाले आहे आणि हैदराबादचा वेगवान गोलंदाज, त्याला त्याचे सहकारी प्रेमाने ‘मियां भाई’ म्हणतात. सिराज आता राष्ट्रीय संघातील आघाडीचा खेळाडू म्हणून विकसित झाला आहे. २०१७ मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्यानंतर, सिराजला या प्रसंगासाठी खूप कष्ट घघ्यावे लागले परंतु वेगवान गोलंदाज म्हणून त्याची उंची गगनाला भिडली. विशेषत: २०२०-२१ मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर जिथे वेगवान गोलंदाजानेही कसोटी पदार्पण केले. त्याचा एक किस्सा त्याने शेअर केला आहे.

मोहम्मद सिराजने आतापर्यंत आयपीएलमध्ये आरसीबीसाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, म्हणूनच तो सध्या संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. सिराजने ९ सामन्यात २०च्या सरासरीने १६ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, त्याने एक घटना सांगितली जेव्हा के.एल. राहुल त्याच्यावर जास्त बाउन्सर टाकल्याबद्दल चिडला होता.

Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”
Tahawwur Hussain Rana extradited to India
२६/११ हल्ल्यापूर्वी १५ दिवस तहव्वूर राणा मुंबईत; हेडलीच्या दोन ईमेलने कटातील सहभागाचा उलगडा
Image of Amit Shah
Amit Shah : “पवार साहेब महाराष्ट्राला हिशोब द्या, तुम्ही सहकार क्षेत्रासाठी काय केले”, अमित शाह यांचा थेट सवाल
auto driver who helped saif ali khan says not able to work
सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “मी घाबरलोय कारण…”
A youth from Bihar files a case against Rahul Gandhi seeking Rs 250 as compensation, highlighting the ongoing legal dispute.
Rahul Gandhi : “ते विधान ऐकून धक्का बसला अन् हातातून दुधाची बादली पडली”, २५० रूपयांसाठी राहुल गांधींविरोधात तरुणाची याचिका

लोकेश राहुल बद्दल एक मजेदार किस्सा

गौरव कपूर सोबत त्याच्या ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या शोमध्ये फ्रीव्हीलिंग चॅटमध्ये, वेगवान गोलंदाजाने के.एल. राहुलशी संबंधित एक प्रसंग सांगितला आहे. ही घटना तेव्हा घडली जेव्हा सिराजने आयपीएलमध्ये पदार्पण केले नव्हते आणि त्यावेळी तो के.एल. राहुलसोबत सलामीला नेट गोलंदाज होता, जो त्यावेळी आरसीबीकडून खेळत होता.

हेही वाचा: IPL2023: “गुजरातमध्ये माझ्या खाण्यापिण्याचे खूपच…”, रवी शास्त्रींच्या प्रश्नावर मोहम्मद शमीचे सूचक विधान

या संवादात तो म्हणाला, “मी २३ वर्षांखालील संघासोबत परफॉर्म केले होते. मी रणजी ट्रॉफीमध्ये एक सामना खेळलो, त्यात एक विकेट घेतली. पण नंतर मला पुढील दोन सामन्यांसाठी वगळण्यात आले आणि मी संघाबाहेर झालो. पुढच्या वर्षी आरसीबी विरुद्ध सनरायझर्स (हैदराबाद) सामना होता आणि तेव्हा मी नेट बॉलर होतो. मी के.एल. राहुलवर बाऊन्सरनंतर बाउन्सर टाकत होतो त्यामुळे तो चिडला. तो म्हणाला की “ तुला फक्त बाउंसर टाकता येतो का? (खाली बाउंसर ही आता है तुझे) सांगितले. मी म्हणालो, “भाऊ, मला इतर गोष्टीही माहीत आहेत.”

सिराजने पुढे सांगितले की, “पुढच्या वर्षी अरुण सर रणजी ट्रॉफीसाठी हैदराबादचे प्रशिक्षक झाले. निवडकर्ते मला रणजी ट्रॉफीसाठी निवडत नव्हते. तर अरुण सर म्हणाले, ‘मला हा मुलगा संघात हवा आहे. तुम्ही ऐकाल तरच मी संघटनेत सामील होईन, अन्यथा नाही. मग अरुण सर आले आणि मला निवडले गेले. मी त्या वर्षी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरलो.” यंदाच्या आयपीएलमध्‍ये सिराजचा इकॉनॉमी रेट ७.०० आणि स्ट्राइक रेट २१.०० असा आहे.

सिराजला त्याचे संघसहकारी प्रेमाने ‘मियाँ भाई’ म्हणतात

मोहम्मद सिराजला खरेतर, हैदराबादच्या वेगवान गोलंदाजाला त्याचे सहकारी प्रेमाने ‘मियांभाई’ म्हणतात, त्याने राष्ट्रीय संघात एक अनुभवी गोलंदाज म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. २०१७ मध्ये त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर वेगवान गोलंदाज म्हणून त्याची उंची वाढली. सिराजच्या आयुष्यात एक वेळ आली जेव्हा त्याला खूप गंभीर दुखापत झाली होती, त्याच दरम्यान त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील ही सर्वात मोठी हानी होती. याशिवाय, सिराजलाही वेगवेगळ्या कारणास्तव लक्ष्य करण्यात आले, परंतु वेगवान गोलंदाजाने स्वत: ला सतत नाउमेद होऊ न देता प्रेरित ठेवले. त्याच्या या सकारात्मक विचारांमुळेच तो भारतीय संघात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

हेही वाचा: ICC Revenue Model: BCCI वर्षाला १९ अब्ज कमावणार, यामुळे इतर देशांचा होतोय जळफळाट; इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचा ICCवर आरोप

टीम इंडियात दाखल झाल्यानंतर सिराजने मागे वळून पाहिले नाही. आयपीएलच्या १६व्या मोसमात सिराज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रमुख खेळाडू असल्याचे सिद्ध झाले आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यांमध्ये गोलंदाजीव्यतिरिक्त, सिराज देखील थोडा आक्रमक आहे, मैदानावर खेळाडूंशी करत असलेल्या वर्तनामुळे तो सतत चर्चेत असतो.

Story img Loader