भारतीय क्रिकेट संघाचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने महेंद्रसिंग धोनीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. हरभजन सिंगने अचानक महेंद्रसिंग धोनीवर केलेल्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने एम.एस. धोनीला आपल्या चाहत्यांच्या भावना दुखावू नयेत असे आवाहन केले आहे. धोनीने आयपीएलमध्ये असेच खेळत राहावे, कारण त्याच्यामध्ये अजून बरेच क्रिकेट शिल्लक आहे, असेही तो म्हणाला. त्याच्या या वक्तव्याने मात्र धोनीचे चाहते मात्र खूप खुश झाले आहेत.
हरभजन सिंगचे धोनीबाबत मोठे विधान
धोनीने मोसमात आतापर्यंत १२ सामन्यांत १९६ च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने ३८ धावा केल्या आहेत. हरभजन स्टार स्पोर्ट्स क्रिकेट लाइव्हवर म्हणाला, “एम.एस. धोनीने निवृत्तीची वेळ थांबवली आहे. तो अजूनही तसाच जुना धोनी दिसतोय. षटकार-चौकारांसारखे तो मोठे फटके मारत आहे, तसेच एकेरी-दुहेरी धावही घेत आहे. तो त्याच्या पूर्ण गतीने धावत नसला तरी तो प्रयत्न करत आहे, दुसऱ्या संघासाठी अजूनही तो धोकादायक खेळाडू आहे. माही आमच्या भावना दुखवू नको, तू आमच्यासाठी खेळत राहिले पाहिजे.” दरम्यान, भारताची माजी क्रिकेटपटू मिताली राजने सीएसकेच्या कर्णधाराचे संघासाठी असणाऱ्या योगदानाबद्दल कौतुक केले आहे. ती म्हणाली, “ त्याचा शांत स्वभाव संघाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना पुढे घेऊन जाण्यात मदत करत आहे. त्याने दिलेले भारतासाठीचे योगदान कधीही कोणीही विसरू शकत नाही.”
मिताली म्हणाली पुढे म्हणाली, “जेव्हा एखादा खेळाडू त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचतो तेव्हा खूप रागीट होतो, गोंगाट करतो. मात्र, महेंद्रसिंग धोनीने या मोसमात धडाकेबाजपणे कुठलाही गाजावाजा न करता हळूहळू आपल्या संघाला मार्गदर्शन करत पुढे नेले. सीएसकेला आतापर्यंत पहिल्या दोन स्थानांवर कसा राहील यासाठी त्याने खूप प्रयत्न केले आहे.”
पुढे मिताली म्हणाली, “केवळ तो कर्णधार आहे म्हणूनच संघ इथपर्यंत मजल मारू शकला. त्याने आखलेल्या मैदानावरील रणनीतीमुळे चेन्नईला चांगली कामगिरी करण्यात मदत झाली आहे.” मिताली म्हणाली, “त्याने या स्पर्धेत अनेक स्मार्ट मूव्ह केले आहेत. अजिंक्य रहाणे हे एक उत्तम उदाहरण म्हटले जाईल. एका चांगल्या कर्णधाराखाली खेळाडू स्वतःला कसे घडवतो हे यावरून कळते.” पुढे ती म्हणाली, “चाहत्यांचा आवाज दूर ठेवून स्वतःला ज्यापद्धतीने एकाग्र ठेवले ते वाखाणण्याजोगी आहे. संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल तिने त्याचे अभिनंदन केले.” सीएसकेचा एक सामना शिल्लक असून दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणारा सामना जिंकणे त्यांना अनिवार्य आहे. पराभव झाल्यास त्यांना प्ले-ऑफ्ससाठी इतर संघाच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.