Chennai Super Kings vs Gujarat Titans, IPL 2023 Final Updates: आयपीएल २०२३च्या अंतिम फेरीत गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होत आहे. हा सामना रविवारीच होणार होता. मात्र, २८मे चा दिवस पावसाने वाहून गेला. आता हा सामना आज राखीव दिवशी खेळला गेला. सोमवारी चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ४ गडी गमावून २१४ धावा केल्या. यानंतर पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. रवींद्र जडेजाने मोहित शर्माच्या शेवटच्या षटकातील दोन चेंडूवर षटकार आणि चौकार मारत रोमहर्षक विजय मिळवला.

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात पावसाने मोठा व्यत्यय आणला. मात्र, रात्री उशिरापर्यंत झालेल्या या सामन्यात अखेर एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला. सीएसके आता आयपीएल इतिहासात पाच वेळा चॅम्पियन ठरणारा दुसरा संघ ठरला आहे. गुजरात टायटन्सला सलग दुसऱ्या आयपीएल हंगामात विजेतेपद आपल्याकडे राखता आले नाही. सीएसकेच्या आघाडीच्या फलंदाजांनी सुरुवातही दणक्यात करून दिली, परंतु गुजरातचे हुकमी एक्के नूर अहमद व मोहित शर्मा यांनी मॅच फिरवली होती. पण, धोनीला विक्रमी पाचवे जेतेपद जिंकून देण्यासाठी ते अपयशी ठरले. रवींद्र जडेजाने थरारक सामन्यात अखेरच्या दोन चेंडूंत १० धावा चोपून विजय मिळवून दिला.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?

नियोजित कार्यक्रमानुसार हा अंतिम सामना २८मे रोजी खेळला जाणार होता. मात्र, या दिवशी एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. परिणामी सामना राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी (२९मे) खेळवण्यात आला. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिल व ऋद्धिमान साहा या जोडीने संघाला पुन्हा एकदा अर्धशतकी सलामी दिली. गिलने ३९ तर साहाने ५४ धावांचे योगदान दिले. मात्र, गुजरातच्या डावाचा नायक युवा साई सुदर्शन हा ठरला. त्याने ४७ चेंडूवर ९६ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या योगदानामुळे गुजरातने ४ बाद २१४ धावा केल्या.

या सामन्यात साई सुदर्शनने गुजरातकडून सर्वाधिक ९६ धावा केल्या. त्याचवेळी ऋद्धिमान साहाने ५४ धावांची खेळी केली. शुबमन गिलने ३९आणि हार्दिक पांड्याने नाबाद २१ धावा केल्या. चेन्नईचे सर्व गोलंदाज चांगलेच महागडे ठरले. पाथिरानाने दोन गडी बाद केले. चहर आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. चेन्नईकडून कॉनवेने सर्वाधिक ४७ धावा केल्या, पण सर्व फलंदाजांनी चांगले योगदान दिले. गुजरातकडून मोहित शर्माने तीन आणि नूरने दोन विकेट घेतल्या. चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा अंतिम सामना कसा जिंकला ते समजून घेऊया.

शेवटच्या षटकात जडेजाची तलवार तळपली

मोहित शर्माने शानदार गोलंदाजी करत चेन्नई संघाला दडपणाखाली आणले होते. शेवटच्या षटकात १३ धावांचा बचाव करताना त्याने पहिल्या चार चेंडूत फक्त तीन धावा दिल्या. यानंतर रवींद्र जडेजाने षटकार आणि चौकार मारून चेन्नईला पाचवे विजेतेपद मिळवून दिले. या सामन्यात धोनी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. अशा स्थितीत सामना संपवण्याची जबाबदारी दुसऱ्या कोणाला तरी घ्यावी लागली आणि धोनीसोबत दशकभर खेळल्यानंतर जडेजाने आपण काय शिकलो हे दाखवून दिले.

चेन्नईला पावसाचा फायदा

पावसामुळे चेन्नई संघाला फायदा झाला. षटके कमी झाली आणि चेन्नईला १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य होते. षटके कमी करून पाच झाली, पण धावगती फारशी वाढली नाही. चेन्नईच्या पूर्ण १० विकेट्स होत्या. अशा स्थितीत कॉनवे आणि ऋतुराज यांनी तुफानी सुरुवात केली. या दोघांनी मिळून चार षटकांच्या पॉवरप्लेमध्ये ५२ धावा जोडल्या. येथून चेन्नई संघ चांगल्या स्थितीत पोहोचला.

रहाणे-रायडूने चेन्नईला सामन्यात आणले

या सामन्यात चौथ्या षटकात अजिंक्य रहाणे फलंदाजीला आला, पण त्यामुळे त्याच्या फलंदाजीत काही फरक पडला नाही. पहिल्या चार चेंडूंत दोन षटकार मारून त्याने आवश्यक धावगती फारशी वाढू दिली नाही. पुढचे षटक नूरचे होते आणि त्याने ते काळजीपूर्वक खेळले. यानंतर राशिदच्या षटकात दोन चौकार मारत त्याने चेन्नईची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली. सुरुवातीच्या ११ चेंडूत २६ धावा करत त्याने चेन्नई संघाला सामन्यात परत आणले. मोहित शर्माने त्याला बाद केले, पण त्यानंतर दुबेने लय पकडली आणि राशिदच्या स्पेलच्या शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारत चेन्नईला सामन्यात रोखले. त्याचवेळी रायुडूने आठ चेंडूंत १९ धावांची झंझावाती खेळी करत चेन्नईची स्थिती आणखी चांगली केली. रायुडूच्या खेळीचा परिणाम असा झाला की, सलग दोन चेंडूंत दोन विकेट्स गमावल्यानंतरही चेन्नईचा संघ सामन्यात कायम राहिला.