आयपीएलच्या १६व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू विराट कोहलीची कामगिरी खूपच प्रभावी ठरली आहे. या मोसमात त्याने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात कोणतीही कसर सोडली नाही, हे आम्ही तुम्हाला सांगतो. त्याचवेळी, रविवारी खेळल्या गेलेल्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या बदल्यात आरसीबीला १९७ धावा करता आल्या.

मात्र, या सामन्यात गुजरातचा खेळाडू शुबमन गिलनेही शतक झळकावत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचवेळी विराट कोहलीनेही या सामन्यात एक विक्रम आपल्या नावावर केला. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे. या लीगमध्ये त्याने ७ शतके झळकावली आहेत. या शतकासह विराट कोहलीने ख्रिस गेलचा विक्रमही मोडला आहे. युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने आयपीएलमध्ये ६ शतके झळकावली आहेत. पण त्याचा विक्रम गुजरातविरुद्ध खेळताना विराट कोहलीने मोडला. या सामन्यात त्याने ६१ चेंडूत १० धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राइक रेट १६५.५७ होता.

India vs Bangladesh 2nd Test from today sport news
वर्चस्व राखण्याचे भारताचे लक्ष्य! बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून; सलग १८व्या मालिका विजयासाठी प्रयत्नशील
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
IND vs BAN Adam Gilchrist on Rishabh Pants comeback
IND vs BAN : ‘ऋषभ पंतचे कसोटीतील पुनरागमन हे क्रिकेटच्या इतिहासातील…’, ॲडम गिलख्रिस्टचे वक्तव्य
IND vs BAN Shubman Gill fifth Test century against Bangladesh
IND vs BAN : शुबमनने शतक झळकावत भारताचा बाबर म्हणणाऱ्यांची बोलती केली बंद, भारताने बांगलादेशला दिले ५१५ धावांचे लक्ष्य
Rohit Sharma Became First Captain to Complete 1000 Runs in 2024 IND vs BAN 1st Test
IND vs BAN: रोहित शर्माने चेन्नई कसोटीत केला मोठा पराक्रम; २०२४ मध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार
IND vs BAN 1st Test Ravichandran Ashwin 6th century
IND vs BAN : रविचंद्रन अश्विनचे ऐतिहासिक शतक! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू
IND vs BAN Rohit Sharma on KL Rahul and Sarfaraz Khan ahead 1st Test match
IND vs BAN : केएल राहुल की सर्फराझ खान? रोहित शर्माने केले स्पष्ट; ‘या’ खेळाडूला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी
Mitchell Starc on Virat Kohli about IND vs AUS Test Series
‘मला त्याच्याविरुद्ध खेळताना…’, मिचेल स्टार्कचे विराटबरोबरच्या स्पर्धेबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आमच्या दोघात…’

हेही वाचा: WTC Final: WTC फायनलमध्ये भारतीय संघाची जर्सी दिसणार ‘या’ नव्या लूकमध्ये, BCCI सचिव जय शाह यांची मोठी घोषणा

मला वाटतं त्याला निवृत्तीतून बाहेर पडावं लागेल – ख्रिस गेल

यापूर्वी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना विराट कोहलीने शतक झळकावले होते. त्याचे हे सलग दुसरे शतक ठरले. त्याचवेळी आरसीबी आणि वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ख्रिस गेलनेही त्याच्या उत्कृष्ट विक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे. तो गंमतीने म्हणाला की मला वाटतं निवृत्तीतून परत यावं लागेल. JioCinema वर बोलताना ख्रिस गेल म्हणाला की, विराट कोहलीवर कधीही शंका घेऊ नका. शानदार खेळी, उत्तम खेळ, तुम्हाला माहीत आहे की त्याने आपल्या संघाला विजयी स्थितीत आणले. विराट आणि फॅफने चांगली फलंदाजी केली पण हे सगळं विराट कोहलीच्या बाबतीत होतं. विराटने उत्कृष्ट खेळी केली. त्याने युनिव्हर्स बॉसलाही मागे टाकले. मी आता निवृत्तीनंतर परत येत असून पुढच्या वर्षी विराटला भेटेन.

कोहलीने वॉर्नर आणि गेलची बरोबरी केली आहे

विराट कोहलीनेही या मोसमात आपल्या शतकी खेळीत ६०० धावा पूर्ण केल्या. त्याने १४ सामन्यात ६३९ धावा केल्या. विराटची सरासरी ५३.२५ आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट १३९.८२ आहे. त्याने दोन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली आहेत. त्याने तिसऱ्यांदा एका मोसमात ६०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. कोहलीने २०१३ आणि २०१६ मध्येही असेच केले होते.

हेही वाचा: IPL 2023: “संघाला अक्षर पटेल खटकतो…” माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर दिल्ली कॅपिटल्सवर संतापले

एका हंगामात ६०० पेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज

के.एल. राहुल -२०१८, २०२०, २०२१, २०२२

विराट कोहली- २०१३, २०१६, २०२३

डेव्हिड वॉर्नर – २०१६, २०१७, २०१९

ख्रिस गेल- २०११, २०१२, २०१३

फाफ डु प्लेसिस – २०२१, २०२३