टी२० क्रिकेटचा बॉस म्हटला जाणारा जोस बटलर आयपीएल २०२३मध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यातही बटलरची बॅट शांत होती आणि तो खाते न उघडता कागिसो रबाडाच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला. यासह त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम झाला आहे. आयपीएलच्या कोणत्याही एका मोसमात ५ वेळा शून्यावर बाद होणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गेल्या वर्षी आपल्या फलंदाजीने राजस्थान रॉयल्सला प्लेऑफमध्ये नेण्यात मोलाची भूमिका बजावणारा बटलर या मोसमात ५ वेळा शून्यावर बाद झाला आहे. इंग्लंडच्या स्टार फलंदाजाच्या नावावर आयपीएलमधील ५ शतकांचा विक्रम आहे. गेल्या मोसमात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आणि एका क्षणी तो विराट कोहलीचा ९६४ धावांचा विक्रम मोडेल असे वाटत होते.
दरम्यान, पंजाब विरुद्ध राजस्थान सामन्यानंतर, कर्णधार संजू सॅमसनने इंस्टाग्रामवर युजवेंद्र चहल आणि जोस बटलर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला, जिथे ते तिघेही मैदानात बसून संभाषण करताना दिसत आहेत आणि काही पाण्याच्या बाटल्या समोर ठेवल्या आहेत. संजू सॅमसनने मल्याळम चित्रपट वन मॅन शोमधील सलीम कुमारच्या हिट डायलॉगला कॅप्शन दिले, “युजी, जोसेटा..कोरचा नेरम इरुन्नू नोकम चेलापो बिर्याणी किटियालो?” (थोडा वेळ बसू, कदाचित आपल्याला बिर्याणी मिळेल आणि ती आपण खाऊ.) जोस बटलरने सॅमसनच्या पोस्टवर एक मजेदार टिप्पणी केली आहे. बटलरने लिहिले, “बिर्याणी नाही… डक पॅनकेक्स!”, ज्याला युजवेंद्र चहलने मजेशीर उत्तर दिले, “हेड शॉट “. जोस बटलर आयपीएल २०२३ मध्ये पाच वेळा बाद झाला आहे.
आयपीएल २०२३ मध्ये याच्या अगदी उलट परिस्थिती होती. जोस बटलर प्रत्येकी एक धाव घेण्यासाठी झगडताना दिसला. पंजाब किंग्ज विरुद्ध, तो रबाडाच्या इनस्विंग चेंडूवर चुकला आणि एलबीडब्ल्यू झाला. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज यापूर्वी टी-२०मध्ये बटलरविरुद्ध चांगलाच महागात पडला होता, पण आज त्याने बदला घेतला. जोस बटलर गेल्या तीन डावात खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
गेल्या मोसमात जोस बटलरने ४ शतके केली होती. संपूर्ण हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असण्यासोबतच तो ऑरेंज कॅपचा विजेताही होता. मात्र, या मोसमात तो ५ वेळा शून्यावर बाद झाला आहे. आयपीएल कारकिर्दीत ५ शतके झळकावणाऱ्या बटलरची ही खराब खेळी पाहून जगभरातील चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.