Kedar Jadhav RCB: इंडियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामात समालोचन करणारा भारताचा माजी फलंदाज केदार जाधवला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी फोन केल्याने तो आश्चर्यचकित झाला. जाधव समालोचन करण्याबरोबरच आपल्या फिटनेसची पूर्ण काळजी घेत होता, त्यामुळे त्यांनी या प्रस्तावाला होकार देण्यास उशीर केला नाही. ३८ वर्षीय फलंदाजाने रणजी ट्रॉफी हंगामात महाराष्ट्रासाठी चांगली फलंदाजी (२८३ धावा) केली.

भारताच्या माजी फलंदाजाने बांगरच्या फोन कॉलची आठवण करून दिली. तो म्हणाला की, “जेव्हा मला संजय बांगर यांचा फोन आला तेव्हा मला एकदम धक्का बसला होता, पण तो सुखद धक्का होता. मी कॉमेंट्री करत होतो आणि संजय भाईंनी मला फोन केला. ते म्हणाले, ‘तू काय करतोय’ त्यांनी विचारले. मी त्यांना सांगितले की, सध्या मी आयपीएलमध्ये कॉमेंट्री करतो आहे. त्यांनी विचारले की मी अजूनही सराव करत आहेस का? आणि मी होकारार्थी उत्तर दिले, आठवड्यातून दोनदा सराव करतो असे सांगितले.”

maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bhaskar Jadhav sunil kedar
“सुनील केदार हे मारुतीच्या बेंबीतला विंचू”, शिवसेना नेते भास्कर जाधव यांची जहरी टीका
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
Sayed Azeempeer Khadri
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारण्यास तयार होते’, काँग्रेसच्या माजी आमदाराच्या विधानामुळं खळबळ
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
readers feedback on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : आगलाव्या भाषणावर आयोग गप्प राहील…
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या

हेही वाचा: IPL2023: अखेर तो मोठ्या ताकदीने परत आला! वरुण चक्रवर्तीच्या 5KMPH वेगात दडले आहे यशाचे रहस्य, जाणून घ्या

माजी खेळाडू जाधव म्हणाला, “बांगर यांनी मला माझ्या फिटनेसबद्दल विचारले, ज्यावर मी सांगितले की मी नियमितपणे जिममध्ये जातो आणि माझ्या हॉटेलमध्ये देखील त्याचा जिमचा वापर करतो आहे. मी त्यांना थोडक्यात सांगितले की मी चांगल्या स्थितीत फिट आणि फाईन आहे.” तेव्हा बांगर म्हणाले की, “मला थोडा वेळ दे, मी तुला पुन्हा फोन करतो.” “त्याच्या म्हणण्यावरून मला समजले की तो फोन करून मला आरसीबीकडून खेळायला सांगेल.”

केदार जाधवने २०१० मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते आणि त्याने आतापर्यंत ९३ सामन्यांमध्ये ११९६ धावा केल्या आहेत. त्याने २०१६ आणि २०१७ मध्ये आरसीबीसाठी १७ सामन्यांमध्ये २३.९२च्या सरासरीने आणि १४२.६६च्या स्ट्राइक रेटने ३११ धावा केल्या आहेत. आरसीबीचा पुढील सामना शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. सध्या संघ गुणतालिकेत टॉप-४ मधून बाहेर आहे.

हेही वाचा: IPL2023: “वाईड बॉल हे निमित्त…”, राजस्थान-बंगळुरू सामन्यात अंपायरशी वाद का झाला? अश्विनने केला खुलासा

केदार जाधवकडे येत असताना नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफीमध्येही तो चांगलाच चर्चेत होता. हीच लय आयपीएलमध्येही कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले. तो संघात सामील झाला आहे, परंतु या हंगामात आरसीबीचे आघाडीचे तीन फलंदाज ज्या प्रकारे फलंदाजी करत आहेत, ते पाहता जाधवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणे थोडे कठीण जात आहे. त्याला आरसीबीने एक कोटी रुपयांमध्ये खरेदी करून संघात समावेश केला आहे.