Former Australian fast bowler Brett Lee: ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने शेवटच्या षटकात नऊ धावा वाचवल्याबद्दल कोलकाता नाईट रायडर्सचा लेग-स्पिनर वरुण चक्रवर्ती याचे कौतुक केले आहे, १० पैकी नऊ वेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने ते साध्य केले असते. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, हेनरिक क्लासेन आणि एडन मार्कराम यांच्यातील ४७ चेंडूत ७० धावांच्या भागीदारीमुळे हैदराबाद काही काळ मजबूत स्थितीत असल्याचे दिसत होते. पण ही जोडी बाद झाल्यामुळे आणि वरुण चक्रवर्तीच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर कोलकाताने हैदराबादवर पाच धावांनी रोमांचक विजय मिळवला. हैदराबादने १६६/८ अशी मजल मारली आणि सलग सहावा सामना गमावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्रेट लीने जिओ सिनेमावर बोलताना म्हटले की, “नऊ धावा शेवटच्या षटकात कोणताही संघ सहज करू शकतो, १० पैकी नऊ वेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने हा सामना जिंकला असता मात्र वरुण चक्रवर्तीने शानदार गोलंदाजी करत एक इतिहास निर्माण केला. त्यात फक्त एक चेंडू होता जो षटकार जाऊ शकला असता मात्र तो विकेट बॉल ठरला. भारतीय संघासाठी ही एक चांगली गोष्ट आहे,  हैदराबादची खराब फलंदाजी देखील त्यांच्या पराभवाला कारणीभूत आहे.”

भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल याने हैदराबादवर टीका करताना म्हटले की, “ते डीएलएस जिंकण्याच्या शोधात होते जेव्हा ते सहज जिंकू शकले असते. कोलकात्याने त्यांच्या गोलंदाजीतील बदलांमुळे हा सामना जिंकला. त्यांनी शेवटच्या षटकापर्यंत वरुण चक्रवर्तीवर विश्वास ठेवला.” भारताचा माजी सलामीवीर रॉबिन उथप्पाने हैदराबादच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, “ते शेवटी खूप खराब खेळले. शेवटी त्यांनी अब्दुल समदसाठी खूप काही धावा सोडल्या त्याचा त्यांना फटका बसला.”

हेही वाचा: IPL2023: विराट की धोनी, कोणाच्या नेतृत्त्वाखाली खेळणार? आयपीएलमध्ये डेब्यू करण्याआधी माजी कर्णधाराशी घेतला पंगा

वरुण चक्रवर्तीची प्रतिक्रिया

सामन्यानंतर वरुण चक्रवर्ती म्हणाला की, “शेवटच्या षटकात माझ्या हृदयाचे ठोके २००पर्यंत पोहोचले होते. फलंदाजाने मैदानाच्या लांब भागात चेंडू मारावा अशी माझी इच्छा होती. चेंडू खूपच सटकत होता. माझा सर्वात चांगला डाव लाँग साईडला होता. हीच माझी एकमेव आशा होती. मी माझ्या पहिल्या षटकात १२ धावा खर्च केल्या होत्या. मार्करमने माझ्या त्या षटकात २ चौकार मारले होते. मागील वर्षी मी ताशी ८५ किमी वेगाने गोलंदाजी करत होतो. मी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मला वाटले की, मला माझ्या रिव्होल्युशनवर काम करण्याची गरज आहे आणि मी त्यावर काम केले.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl2023 nine times out of 10 the team chasing the target would have achieved it brett lee avw