इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघांमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांची गणना होते. मुंबईने आतापर्यंत ५ वेळा, तर चेन्नईने ४ वेळा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. अशात हे दोन्ही संघ आयपीएल २०२३ स्पर्धेच्या १२व्या सामन्यात शनिवारी (दि. ८ एप्रिल) भिडणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील काही खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होत असताना एक वेगळाच उत्साह असतो. रोहित शर्मा आणि एमएस धोनी या भारतीय क्रिकेटच्या दोन दिग्गजांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक जेतेपदांसह ते दोन सर्वाधिक फॉलो केलेले संघ आहेत. रोहित आणि धोनी मात्र त्यांच्या कारकिर्दीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. रोहित हा टीम इंडियाचा कर्णधार असून यावर्षी भारताचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपुष्टात येईल अशी आशा आहे. दुसरीकडे धोनीने तीन वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली आणि आता तो फक्त आयपीएलमध्ये खेळतो.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल

हेही वाचा: IPL2023, RR vs DC: ‘काय षटकार, काय चौकार, काय ती फलंदाजी, गुवाहाटीत बटलरने केले राजस्थानचे काम ओके’; दिल्लीसमोर विजयासाठी २०० धावांचे आव्हान

रोहित आणि धोनीच्या कामगिरीने मात्र या आयपीएलमधील वेगळीच कहाणी सांगितली जात आहे. धोनी एक फिनिशर म्हणून त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परत दिसत आहे. जणू काही घड्याळाचे काटे मागे फिरले असून जुना माही परत आला असे सर्वांना वाटत आहे. मात्र, दुसरीकडे रोहित त्याच्या सर्वोत्तम कामगिरीपासून दूर दिसत आहे. त्याचा फॉर्म सध्या हरवला आहे की काय असे त्याच्या फलंदाजीवरून दिसत आहे. जरी मुंबई आयपीएलच्या या मोसमात एकच सामना खेळलेली असली तरी देखील रोहित त्याच्या क्षमतेपेक्षा थोडा खराब फलंदाजी करत आहे पण खेळाडूला फक्त एका अपयशाने ठरवता कामा नये.

भारताचा माजी अष्टपैलू युसूफ पठाण, ज्याने चेन्नई आणि मुंबई या दोन्हींविरुद्ध भरपूर क्रिकेट खेळले आहे. चाहते म्हणतात की, “रोहितच्या नेतृत्वाखालील संघाला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळण्याचा फायदा होईल.” “मुंबईतील चाहत्यांना महेंद्रसिंग धोनीने त्याच्या फलंदाजीने त्यांचे मनोरंजन करावे अशी नेहमीच इच्छा असते. पण सामना मात्र मुंबई इंडियन्सनेच जिंकावा अशी सर्वांची इच्छा आहे.” “मुंबईला घरच्या मैदानावर पराभूत करणे अवघड आहे. वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत १० सामने झाले आहेत. आणि एमआयने सात वेळा विजय मिळवला आहे. जर तुमचा आकड्यांवर विश्वास असेल, तर मुंबई इंडियन्स हे दोन महत्त्वाचे गुण नक्कीच मिळवतील,” युसूफ पठाणने स्टार स्पोर्ट्सला सांगितले.

हेही वाचा: MS Dhoni on CSK: धोनीच्या कॅप्टन्सीने इरिटेट होतात खेळाडू? चेन्नई सुपर किंग्सच्या माजी खेळाडूने केला मोठा खुलासा

दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने मुंबई इंडियन्सला सावध केले आणि म्हटले की सीएसके कोणत्याही ठिकाणी धोकादायक असू शकते. “एमआय घरच्या मैदानावर नेहमीच मजबूत दिसते परंतु सीएसकेला कोणत्याही मैदानावर पराभूत करणे कठीण आहे. अशा परिस्थितीत एमआयला या हंगामातील पहिले दोन गुण मिळविण्यासाठी वानखेडेवर कठोर परिश्रम करावे लागतील.”

Story img Loader