IPL2023, MS Dhoni: चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी आणि हुशार कर्णधारांमध्ये गणला जातो. मंगळवारी आयपीएल २०२३मध्ये गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान कर्णधार धोनीने क्रिकेट जगताला दोन भाग पाडून टाकले. एकीकडे चाहते त्याच्या कर्णधाराचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे अनेक माजी क्रिकेटपटू धोनीच्या या कृतीवर टीका करत आहेत. धोनीच्या टीकाकारांमध्ये माजी अंपायर्सनीही उडी घेतली आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एम.एस. धोनी २३ मे रोजी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर गुजरात टायटन्स विरुद्ध आयपीएल २०२३चा पहिला क्वालिफायर सामना खेळला होता, परंतु या सामन्यादरम्यान खेळाच्या भावनेचा आदर न केल्यामुळे आयसीसीचे माजी अंपायर डॅरिल धोनी यांच्यावर टीका करण्यात आली. हार्परने त्याच्यावर टीका केली.
गुजरातविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर सामन्याच्या दुसऱ्या डावातील १६व्या षटकात एम.एस. धोनीचा अंपायरशी वाद झाला. खरं तर, चेन्नईचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना काही मिनिटांसाठी मैदानाबाहेर होता आणि त्यामुळे लगेचच मैदानात परतल्यानंतर त्याला अंपायरने गोलंदाजी करण्याची परवानगी दिली नाही. नियमांनुसार, जो खेळाडू ८ मिनिटांपेक्षा जास्त वेळ मैदानाबाहेर राहतो, त्याला गोलंदाजी करण्यासाठी मैदानावर आल्यानंतर तेवढाच वेळ मैदानावर घालवावा लागतो.
मात्र, एम.एस. धोनीला त्याच्याकडून गोलंदाजी करून घ्यायची होती. मैदानावर आल्यानंतर केवळ ५ मिनिटांनी पाथिरानाला गोलंदाजीला परत आणायचे होते आणि त्याच गोष्टीवरून मैदानावरील अंपायरशी वाद झाला. तो वाद म्हणजे केवळ वेळ काढण्याचा प्रयत्न होता असे वाटले. या घटनेनंतर, माजी अंपायर डॅरिल हार्पर यांनी धोनीवर खिलाडूवृत्तीचा अभाव आणि मैदानावरील अंपायर्सचा अनादर केल्याबद्दल टीका केली.
७१ वर्षीय हार्पर म्हणाले की, “काही लोक कायद्यापेक्षा मोठे असू शकतात, परंतु लोक जिंकण्यासाठी काहीही करतील हे पाहून मी निराश झालो.” ते पुढे म्हणाले की, काही लोक जिंकण्यासाठी कुठली हद्द पार करतील काही सांगता येत नाही, धोनीची ही कृती पाहून मला धक्का बसला. आजकाल धोनी मैदानावर पूर्वीसारखा शांत दिसत नाही आणि तो आपला राग खेळाडूंवर काढत असतो. खेळाचा अनादर करणाऱ्या अशा खेळाडूंना वेळीच समज द्यायला हवी. क्रिकेटपेक्षा कोणीही मोठे नाही मग तो धोनी जरी असला तरी नाही.” क्वालिफायर १मध्ये, चेन्नईने गुजरातचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. आयपीएल २०२३चा अंतिम सामना २८ जून रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.