IPL 2023, Suyash Sharma: आयपीएल २०२३मध्ये कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी निराशाजनक असेल पण प्रत्येकवेळी प्रमाणे या हंगामातही या संघातून अनेक खेळाडू उदयास आले आहेत आणि त्यातीलच एक खेळाडूचे नाव आहे सुयश शर्मा. सुयश शर्मा या हंगामात कोलकातासाठी अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्याने आपल्या कामगिरीने चाहत्यांची आणि क्रिकेट तज्ञांची मने जिंकली आहेत, मात्र, सुयश शर्मासाठी आयपीएलमध्ये पोहोचण्याचा प्रवास फारसा सोपा नव्हता.

आयपीएल २०२३मध्ये, आपल्या फिरकी कौशल्याने मोठमोठ्या फलंदाजांना गोलंदाजीच्या तालावर नाचवणारा सुयश शर्माने काही दिवसांपूर्वी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत एक घटना घडली आहे. बीसीसीआयने त्याला १९ वर्षाखालील क्रिकेट संघातून वगळले. मध्यरात्री तीन वाजता त्याच्या घरी आला आणि स्वतःच्या हाताने मुंडण करून घेतले. त्याने त्याच्या डोक्यावरील केस का भादरले याचे कारण सांगितले. अंडर-१९ संघातून वगळल्याने तो खूप नाराज झाला म्हणून त्याने रागाच्या भरात हे कृत्य केले.

हेही वाचा: Yashasvi Jaiswal Fastest Fifty: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास! IPL इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या खेळाडू नेमकं कोण आहेत? जाणून घ्या

सध्याच्या आयपीएल हंगामात, सुयशने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पदार्पण केले. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात ३ विकेट्स घेऊन त्याने दाखवून दिले की तो या हंगामामध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. सुयश शर्मा १९ वर्षाखालील असताना त्याच्या चांगल्या कामगिरीनंतर देखील दुर्लक्षित केले आहे. फिटनेस चाचणीत तो पूर्णपणे फिट नव्हता असे कारण देऊन त्याला संघातून डच्चू दिला. हे सर्व समजल्यावर तो खूप रडला.

टीम इंडियात निवड न झाल्याची व्यथा सांगितली

या घटनेबाबत सुयशने स्वतः खुलासा केला आहे की अंडर-१९ संघात स्थान मिळवू न शकल्याने तो खूप निराश झाला होता. एका मुलाखतीत आयपीएलशी बोलताना केकेआरचा फिरकीपटू म्हणाला, “गेल्या वर्षी मी अंडर-१९साठी ट्रायल दिली आणि ती चांगली झाली होती. रात्री १२.३० वाजता निवड केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली त्यात माझे नाव नव्हते. तिथे यादी जारी केली आणि पहाटे ३ वाजेपर्यंत मी खूप रडलो. मला सांगण्यात आले की त्यांना माझी एकदा गोलंदाजी पाहायची आहे. मी तिथे गेलो पण मला ठाऊक होते की मला संघात निवडले जाणार नाही. मी खूप रडलो परत आलो आणि माझे मुंडन केले. मी खूप निराश झालो. चांगली कामगिरी करूनही, माझ्यासोबत असे घडत आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता.”

हेही वाचा: IPL2023: “…हा पाकिस्तानी”, यशस्वी जैस्वालला शतकापासून वंचित ठेवणाऱ्या सुयशवर माजी खेळाडूने डागली तोफ

विशेष म्हणजे केकेआरचा गोलंदाज ईडन गार्डन्सवर आयपीएल सुरू होण्यापूर्वी एकाही व्यावसायिक स्पर्धेत सहभागी झाला नव्हता. पुढे बोलताना सुयश म्हणाला, “त्यानंतर मी माझ्या गोलंदाजी कौशल्यावर अधिक मेहनत घेतली. देवासमोर शपथ घेतली की एक दिवस ते मला स्वतः कॉल करतील आणि नंतर हळूहळू केस पुन्हा वाढू लागले आणि परफॉर्मन्सही सुधारला म्हणून मी केस तसेच वाढू दिले. ही हेअरस्टाईल मला खूप आवडली आणि म्हणूनच मी आता लांब केस कधीच कापले नाहीत.”

Story img Loader