आयपीएल २०२३ आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. २८ मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे, त्याआधी फक्त एक सामना बाकी आहेत, एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ८१ धावांनी दणदणीत विजय मिळवत दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात प्रवेश केला. आता गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात जो सामना जिंकेल तो चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रविवारी दोन हात करेल.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने पुन्हा एकदा आयपीएलच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आयपीएल २०२३च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत केल्यानंतर आता सुपर किंग्स संघ स्पर्धेच्या इतिहासात १०व्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. दरम्यान, आता संघाचा मुख्य गोलंदाज दीपक चाहरने खुलासा केला आहे की तो आपल्या सहकारी परदेशी खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी कसे प्रेरित करतो. दीपक चाहरने जिओ सिनेमावर बोलताना खुलासा केला की, “तो सुपर किंग्जमध्ये सहभागी असलेल्या परदेशी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पैशाचे आमिष दाखवतो.” त्याचा हा गंमतीशीर व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
भारताचा स्विंग गोलंदाज बनला बिझनेस गुरु
२३ मे रोजी आयपीएल २०२३चा पहिला क्वालिफायर सामना खेळला गेला. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव करत २८ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यापूर्वी दीपक चाहरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दीपक फायनल मॅचसाठी चेन्नईच्या खेळाडूंना एका खास प्रकारची प्रेरणा देत आहे.
अंतिम सामन्यापूर्वी दीपक चाहरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दीपक फायनल मॅचसाठी चेन्नईच्या खेळाडूंना एक खास प्रकारची गोष्ट सांगून त्यांना प्रेरणा देत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया. चेपॉकमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव केल्यानंतर दीपक चाहर म्हणाला, “मी फक्त संघ जिंकण्याबद्दल बोलतो. पण कधी कधी परदेशी खेळाडूंना सल्ला देण्यासाठी मी पैशाबाबत बोलतो. मी त्यांना सांगतो की जर आपण जिंकलो तर खूप चांगला बोनस मिळेल. ते ज्या देशांचे खेळाडू आहेत त्यांना त्यांच्या देशाच्या चलनात मिळालेली रक्कम रूपांतरित करून सांगतो आणि सामना जिंकल्यानंतर त्यांना किती पैसे मिळतील याबाबत मार्गदर्शन करतो.”
काल सामना संपल्यानंतर सुरेश रैना आणि जतीन सप्रू दीपक चाहर यांच्याशी बोलत होते. दरम्यान, दीपक चाहर सांगतो की तो परदेशी खेळाडूंना अंतिम सामना जिंकण्यासाठी कशा प्रकारे प्रेरित करत आहे. तो म्हणाला की, “आयपीएलमधील फायनल जिंकण्याची रक्कम श्रीलंकेच्या चलनात मथिसा पाथिराना रूपांतरित करून किती होतील यावर त्याला सांगत होतो. जर तुम्ही जिंकले तर त्यानंतर तुम्हाला ९ कोटी रुपये मिळतील डेव्हॉन कॉनवेला न्यूझीलंड डॉलरमध्ये रूपांतरित करून तो सांगतो.” हे ऐकून सागेल जण जोरजोरात हसायला लागतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.