Ishan Kishan Six Video Viral : आयपीएल २०२३ चा ४६ वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मोहालीच्या बिंद्रा स्टेडियममध्ये होत आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत २० षटकांत ३ विकेट्स गमावत २१४ धावा केल्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला मुंबईचा सलामीवीर फलंदाज ईशान किशनने अप्रतिम फलंदाजी केली. ईशानने पंजाबचा गोलंदाज हरप्रीत ब्रारला ९८ मीटरचा गगनचुंबी षटकार ठोकला. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत ईशानने मुंबई इंडियन्ससाठी ४१ चेंडूत ४ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीनं ७५ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. ईशानने ठोकलेल्या षटकारांचा व्हिडीओ इंडियन प्रीमियर लीगच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. मुंबईने १८.५ षटकात ४ विकेट्स गमावत २१५ धावा करून पंजाब किंग्जविरुद्ध दणदणीत विजय मिळवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा