Virat Kohli and Ishant Sharma funny video : विराट कोहली आणि इशांत शर्मा लहानपणापासूनचे मित्र आहेत. दोघेही लहानपणापासून दिल्लीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत. इशांतने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा त्याचे नाव टीम इंडियामध्ये आले, तेव्हा विराटनेच पहिल्यांदा सांगितले होते. विराटही इशांतच्या आवाजाची नक्कल करतो. एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील सामन्यात दोन जुने मित्र आमनेसामने आले. या सामन्यात आरसीबीकडून खेळणाऱ्या विराटला दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या इशांतने झेलबाद केले. यानंतर इशांत विराट कोहलीली डिवतताना दिसला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इशांतने विराटला टी-२० मध्ये पहिल्यांदाच केले बाद –

या सामन्यात इशांत शर्माने विराट कोहलीला बाद केले. आयपीएल २०२४ मध्ये विराट जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही त्याने शानदार सुरुवात केली. तो मैदानाच्या चारही कोपऱ्यांत फटके खेळत होता. इशांतच्या ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूने विराटच्या बॅटची कडा घेतली आणि अभिषेक पोरेलच्या हातात विसावला. इशांतने विराटला टी-२० मध्ये पहिल्यांदाच बाद केले आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आऊट झाल्यानंतर डिवचणाऱ्या इंशातला विराटने दिला धक्का –

विराट कोहलीला बाद केल्यानंतर इशांत शर्माच्या आनंदाला पारावार उरला नाही. मित्राला चिडवण्याची संधी मिळण्यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती असू शकते? इशांतने ही संधी सोडली नाही आणि विराटला खिजवण्यासाठी त्याच्या जवळ गेला. त्यावेळी विराट कोहलीने त्याला धक्का दिला. यानंतर दोघे एकमेकांकडे पाहून हसू लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांना आवडत आहे.

हेही वाचा – CSK vs RR : रवींद्र जडेजाने केली मोठी चूक, विचित्र पद्धतीने झाला धावबाद, VIDEO व्हायरल, जाणून घ्या काय आहे नियम?

विराटने मारले होते दोन षटकार –

आऊट होण्यापूर्वी विराट कोहलीने इशांत शर्मालाही चिडवले होते. विराटने पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इशांतविरुद्ध षटकार ठोकला. त्यानंतर विराटने बाद झालेल्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. यानंतर तो इशांतजवळ जाऊन काहीतरी बोलला. त्यानंतर विराटच्या बॅटमधून षटकार आला आणि त्याने पुन्हा इशांतकडे बोट दाखवले. पण शेवटी इशांत शर्माने बाजी मारली.

हेही वाचा – CSK vs RR : संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्ससाठी रचला इतिहास! शेन वॉर्नला मागे टाकत केला खास पराक्रम

बंगळुरुने दिल्लीला दिले १८८ धावांचे लक्ष्य –

दिल्लीने शेवटच्या षटकांमध्ये शानदार पुनरागमन करत बेंगळुरूला केवळ १८७ धावांवर रोखले. एकेकाळी आरसीबी २२० चा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते, पण नियमित विकेट गमावल्याने आणि शेवटच्या ३ षटकात केवळ १८ धावा केल्यामुळे बेंगळुरू संघ २० षटकात ९ गडी गमावून १८७ धावाच करू शकला. आरसीबीसाठी रजत पाटीदारने ३२ चेंडूत ५२ धावा, विल जॅकने २९ चेंडूत ४१ धावा, विराट कोहलीने १३ चेंडूत २७ धावा आणि कॅमेरून ग्रीनने २४ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishant sharmas funny celebration after dismissing virat kohli for first time in ipl history during rcb vs dc match vbm