Ishant Reveals About Friendship With Virat: इशांत शर्मा आणि विराट कोहली हे दिल्लीचे रहिवासी आहेत. मात्र, दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व करतात. इशांत शर्मा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो, तर विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग आहे, पण इशांत शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील मैत्री विलक्षण आहे यात शंका नाही. आता दिल्ली कॅपिटल्सच्या पॉडकास्टमध्ये इशांत शर्माने विराट कोहलीसोबतच्या मैत्रीवर मोकळेपणाने व्यक्त झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यावेळी आमच्याकडे जास्त पैसे नव्हते, पण…’

इशांत शर्मा म्हणाला की, विराट कोहलीचे पश्चिम दिल्लीचे दिवस फार लोकांनी पाहिलेले नाहीत, पण मी जवळून पाहिले आहेत. तसेच त्याने एक प्रसंग सांगितला, त्यावेळी विराट कोहली अंडर-17 क्रिकेट खेळत होता. या पॉडकास्टमध्ये इशांत शर्मा म्हणाला की, विराट कोहली सर्वोत्तम व्यक्ती आहे. आम्ही दोघे कोलकात्यात अंडर-17 क्रिकेट खेळायचो, जरी त्यावेळी आमच्याकडे जास्त पैसे नव्हते. इशांत शर्मा सांगतो की, जेव्हा आम्ही दोघे कोलकात्यात अंडर-17 क्रिकेट खेळायचो, तेव्हा सरावानंतर एग रोल आणि सॉफ्ट ड्रिंक्स प्यायचो. विराट कोहलीचे अनेक कोणीही न पाहिलेले पैलू मी पाहिले आहेत.

पॉडकास्ट सोशल मीडियावर व्हायरल –

मात्र, इशांत शर्माचा हा पॉडकास्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. विशेष म्हणजे इशांत शर्मा आणि विराट कोहली चांगले मित्र आहेत. दोन्ही खेळाडू दिल्लीचे आहेत. इशांत शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय क्रिकेट संघासाठी दिल्लीशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकत्र खेळले आहेत. आता दिल्ली कॅपिटल्सच्या पॉडकास्टमध्ये इशांत शर्माने विराट कोहलीसोबतच्या मैत्रीवर मोकळेपणाने गप्पा मारल्य. यासोबतच त्याने विराट कोहलीशी संबंधित कधीही न ऐकलेल्या पैलूंबद्दल सांगितले.

विराट कोहलीने हैदराबादविरुद्धच्या दुसऱ्या डावात ६३ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या, तर हेन्रिक क्लासेनने पहिल्या डावात आरसीबीविरुद्ध ५१ चेंडूंत जोरदार १०४ धावा केल्या. सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी शतकं झळकावण्याची आयपीएलच्या इतिहासातील ही पहिली वेळ होती. यापूर्वी आयपीएल सामन्यांमध्ये दोन शतके झळकावली आहे, परंतु एकाच संघातील खेळाडूंनी हा कारनामा केला होता.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishant sharmas statement on friendship with virat kohli said just like delhi boy nothing has changed vbm