कर्णधार म्हणून रोहित शर्मा याचे कौशल्य अतिशय कौतुकास्पद आहे. दिवसेंदिवस त्याची नेतृत्वशैली अधिकाधिक परिपक्व होत आहे, अशा शब्दांत सचिन तेंडुलकर याने रोहितचे कौतुक केले.
रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल स्पर्धा जिंकली. ‘‘मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून रोहितने ज्या वेळी सुरुवात केली, त्यापेक्षाही आजचा रोहित खूप वेगळा आहे. कर्णधार म्हणून त्याने अनेक आव्हाने पेलली आहेत. यंदा सुरुवातीला मुंबईची कामगिरी खूप खराब झाली. तरीही त्याने मनोधैर्य खचू न देता संघाला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिले ही त्याच्या कुशल नेतृत्वाचीच पावती आहे. त्याच्या नेतृत्वात भरपूर आत्मविश्वास दिसतोय.’’, असे सचिनने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व आयपीएल २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is not how you start but how you finish says sachin tendulkar