Jason Roy Fined 10 Percent of Match Fee: आयपीएलच्या २०२३ मधील ३६वा सामना बुधवारी केकेआर आणि आरसीबी संघात खेळला गेला. या सामन्यात केकेआरने आरसीबीचा २१ धावांनी पराभव करून त्यांची पराभवाची मालिका खंडित केली. आरसीबीविरुद्धच्या या विजयाचा हिरो स्टार फलंदाज जेसन रॉय ठरला. मात्र, सामन्यादरम्यान जेसन रॉयकडून मोठी चूक झाली आणि तो आयपीएल आचारसंहिता मोडल्याप्रकरणी दोषी आढळला. त्यामुळे शिक्षा म्हणून जेसन रॉयच्या मॅच फीमध्ये १०% कपात करण्यात आली आहे.

आयपीएलने जारी केलेल्या प्रेस रिलीझमध्ये जेसन रॉयला दंड ठोठावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रेस रिलीझमध्ये म्हटले आहे की, “कोलकाता नाइट रायडर्सचा फलंदाज जेसन रॉयला मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.” आयपीएल २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आचारसंहिता मोडल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. रिलीझमध्ये पुढे म्हटले आहे की, “जेसन रॉय कलम २.२अंतर्गत लेव्हल वनमध्ये दोषी आढळला आहे. या चुकीसाठी मॅच फीच्या १० टक्क्यांपर्यंत दंड आकारला जातो. सामनाधिकारी यांचा निर्णय अंतिम असतो.”

Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa
कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Manu Bhaker Special Message to Neeraj Chopra on His Injury in Diamond League
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेरचा नीरज चोप्रासाठी खास संदेश, दुखापतीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हणाली…
Mitchell Starc on Virat Kohli about IND vs AUS Test Series
‘मला त्याच्याविरुद्ध खेळताना…’, मिचेल स्टार्कचे विराटबरोबरच्या स्पर्धेबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आमच्या दोघात…’
fraud of 18 lakhs by luring tickets for World Cup matches
विश्वचषक सामन्यांच्या तिकीटांचे आमिष दाखवून १८ लाखांची फसवणूक
Duleep Trophy 2024 Rishabh Pant joins Shubman Gill lead A team
ऋषभने आपल्या कृतीने जिंकली पुन्हा चाहत्यांची मनं, विरोधी संघाची रणनीती जाणून घेण्यासाठी केलं असं काही की…
French woman raped 100 times by 50 men
French woman: १० वर्ष, ५० लोक आणि १०० वेळा बलात्कार; पत्नीला अमली पदार्थ देऊन पतीचं क्रूर कृत्य
bombay hc impose fine of two lakhs to accused and victim while canceling the rape case
बलात्काराचा गुन्हा रद्द करताना आरोपी आणि पीडितेला प्रत्येकी दोन लाखांचा दंड; सैनिकांसाठी दंडाची रक्कम वापरण्याची सूचना

जेसन रॉयला दंड ठोठावला –

आयपीएलचे नियम मोडल्याबद्दल रॉय दोषी आढळला आणि त्याच्या मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला. त्याने आयपीएल आचारसंहितेच्या २.२ च्या लेव्हल १ चा गुन्हा देखील स्वीकारला आहे. रॉय बाद झाल्यानंतर त्याने गैरवर्तन केले, ज्यासाठी त्याला दंड सुनावला. १०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विजयकुमार वैशाखने रॉयला बोल्ड केले, त्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना रॉयने आपला राग दाखवत बॅट हवेत फेकली. त्यांच्या या वागण्यावर बरीच टीकाही झाली होती.

केकेआरने चार सामन्यांनंतर विजय मिळवला –

मात्र, याआधी जेसन रॉयने शानदार फलंदाजी करताना केकेआरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. जेसन रॉयने २९ चेंडूत ५६ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. या खेळीमुळे केकेआरने २० षटकांत ५ विकेट गमावून २०० धावांची मोठी धावसंख्या उभारली. या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबी संघाला २० षटकांत केवळ १७९ धावाच करता आल्या.

हेही वाचा –IPL 2023: टीम पार्टीमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूचे महिलेशी गैरवर्तन, फ्रेंचायझीकडून आचारसंहिता लागू

आरसीबीवर २१ धावांनी विजय मिळवण्यासोबतच केकेआरने सलग चार सामन्यांतील पराभवाची मालिकाही खंडित केली. आयपीएल १६ मधील ८व्या सामन्यातील केकेआरचा हा तिसरा विजय ठरला. या विजयासह केकेआर गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. एवढेच नाही तर केकेआरच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशाही अबाधित आहेत.