Jasprit Bumrah Record MI vs LSG IPL 2025: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध खेळत आहे. मुंबई इंडियन्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्स गमावत २१५ धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौ संघाचं जसप्रीत बुमराहने एका षटकात ३ विकेट्स घेत कंबरडं मोडलं. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तिसऱ्या षटकात मुंबईला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. या विकेटसह जसप्रीत बुमराहने मोठी कामगिरी केली आहे.

जसप्रीत बुमराहने ४ षटकांत ५.५० च्या इकॉनॉमीने २२ धावा दिल्या आणि ४ फलंदाजांना बाद केले. बुमराहने तिसऱ्या षटकात गोलंदाजीला येत एडन मारक्रम जाळ्यात फसवत बाद केलं आणि संघाला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. तर बुमराहने नंतर १६व्या षटकात ३ विकेट्स घेत मुंबईचा विजय निश्चित केला.

लखनौ सुपर जायंट्सच्या डावाच्या १६ व्या षटकात जसप्रीत बुमराहने विकेट्सची रांग लावली. या षटकात जसप्रीत बुमराहने एकूण ३ फलंदाजांच्या विकेट घेतल्या. त्याने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डेव्हिड मिलरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर, त्याने ५ व्या चेंडूवर अब्दुल समदला क्लीन बोल्ड करत विकेट मिळवली. त्याच वेळी, षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आवेश खान त्याचा बळी ठरला.

विशेष म्हणजे बुमराहने अब्दुल समद आणि आवेश खान यांना क्लीन बोल्ड केले. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ४१ फलंदाजांना क्लीन बोल्ड केलं आहे. या यादीत तो वेगवान गोलंदाजांच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्याच्या पुढे फक्त लसिथ मलिंगा आहे ज्याने ६३ वेळा गोलंदाजी केली आहे.

जसप्रीत बुमराहने एडन मारक्रमची विकेट घेतला लसिथ मलिंगाला मागे टाकत संघाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. मलिंगाने १७० विकेट घेतल्या होत्या. तर बुमराहने त्याला मागे टाकत आता १७४ विकेट्सचा आकडा गाठला आहे.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

१७४ जसप्रीत बुमराह<br>१७० लसिथ मलिंगा
१२७ हरभजन सिंग
७१ मिचेल मॅकक्लेघन
६९ किरॉन पोलार्ड
६५ हार्दिक पांड्या</p>