Jasprit Bumrah gifting his purple cap to a small fan : लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध मुंबई इंडियन्स संघाला ४ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. संघाने लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी १४५ धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना लखनऊ संघाने सहज विजय मिळवला. हा सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सामना हरल्यानंतर चाहत्यांचे मन जिंकण्यात यशस्वी झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जसप्रीत बुमराहने चाहत्याला दिली पर्पल कॅप –

जसप्रीत बुमराहने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ४ षटकात १७ धावा दिल्या. मात्र त्याला एकही विकेट घेण्यात यश आले नाही. पंरतु तरी देखीलतो आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची यादीत अव्वल स्थानी आहे, त्यामुळे मानाची पर्पल कॅप त्याला देण्यात आली आहे. लखनऊविरुद्धचा सामना हरल्यानंतर बुमराहने त्याची पर्पल कॅप एका लहान चाहत्याला दिली. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मुलगा बुमराहला सर-सर म्हणताना दिला. यावर बुमराहने त्या मुलाला कागदावर ऑटोग्राफ देतो आणि आपल्या डोक्यावरची पर्पल कॅप त्या मुलाला देतो. ज्यानंतर मुलगा आनंदाने उड्या मारत जातो. या क्षणांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आयपीएल २०२४ मध्ये बुमराहने किती विकेट्स घेतल्या आहेत?

जसप्रीत बुमराहने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत १० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १४ विकेट घेतल्या असून केवळ २५६ धावा दिल्या आहेत. त्याच्याशिवाय मुस्तफिझूर रहमान आणि हर्षल पटेल यांनीही प्रत्येकी १४ विकेट्स घेतल्या आहेत. पण या खेळाडूंनी बुमराहपेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. बुमराहची गणना सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. यॉर्कर बॉल टाकण्यात त्याची बरोबरी कोणीही करु शकत नाही.

हेही वाचा – VIDEO : ‘तू माझ्यापेक्षा फक्त तीन वर्षांनी मोठा आहेस…’, रोहितने अमित मिश्राच्या वयावर उपस्थित केला प्रश्न

मुंबईसाठी प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग कठीण –

आयपीएल २०२४ मुंबई इंडियन्ससाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. कारण चालू हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी चागंली झाली नाही. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत, त्यापैकी केवळ ३ जिंकण्यात संघाला यश आले आहे आणि ७ पराभव पत्करावे लागले आहेत. मुंबईचे ६ गुण आहेत आणि ते गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग कठीण झाला आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasprit bumrah gifting his purple cap to a small fan after the match against lucknow video viral vbm