Jasprit Buram Karun Nair Fight IPL 2025 Video: मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव करत थरारक विजय मिळवला आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा विस्फोटक फलंदाज करूण नायरने ८९ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीदरम्यान त्याने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर चांगलीच फटकेबाजी केली. पण त्यानंतर अचानक दोन्ही खेळाडूंमध्ये वाद रंगल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईने दिलेल्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ १९ षटकांत १९३ धावांवर सर्वबाद झाला. या हंगामात दिल्लीचा हा पहिलाच पराभव आहे. सामन्यादरम्यान जोरदार वादही पाहायला मिळाला. मैदानात जसप्रीत बुमराह आणि दिल्लीचा फलंदाज करुण नायर यांच्यात वाद झाला. एमआयचा कर्णधार हार्दिक पंड्याने हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवला.

दुखापतीनंतर बुमराह क्रिकेटच्या पुनरागमन करत आहे, पण तो फॉर्ममध्ये दिसत नाहीये. त्याच्या षटकात दिल्लीच्या फलंदाजांनी भरपूर धावा केल्या. करुण नायर तीन वर्षांनी आयपीएल खेळत असून त्याने आयपीएलमध्ये पुनरागमनाचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला. यादरम्यान त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर चांगलीच फटकेबाजी केली.

बुमराहच्या सहाव्या षटकात करूण नायरने दोन षटकार आणि एक चौकार लगावत वादळी फटकेबाजी केली. तर अखेरच्या चेंडूवर त्याने दोन धावा घेत २२ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दुसरी धाव घेताना त्याने चुकून बुमराहला धक्का दिला. त्याने बुमराहही दचकला. यानंतर करूणने त्याला हात दाखवला. त्यानंतर टाईमआऊट झाला. या टाईमआऊटदरम्यान बुमराह दिल्लीच्या खेळाडूंच्या घोळक्यात जात करूणला काहीतरी बोलून परतला.

यानंतर करूण नायर हार्दिक पंड्याला समजावताना दिसला आणि तो म्हणताना दिसला की, मी त्याला काहीच बोललो नाही. बुमराह रागात असताना हा वाद सुरू होता. पण फिल्डिंग करत असलेला रोहित शर्मा मात्र हसत हसत त्याची फिरकी घेताना दिसला. रोहित शर्माचा हा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा फाफ डू प्लेसिस मुंबईविरूद्ध सामन्याकरता फिट नसल्याने करूण नायरला ३ वर्षांनी आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं. गेल्या काही काळापासून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे आणि दमदार फॉर्मात आहे, तोच फॉर्म त्याने इथे कायम ठेवला. करूणने या सामन्याक ४० चेंडूत २२२ च्या स्ट्राईक रेटने १२ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची खेळी केली, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.