Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Match Updates: आयपीएल २०२४ चा ५५वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहे. मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने हैदराबादच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला आहे आणि धावांवर चांगलाच ब्रेक लागला आहे. या सामन्यात मुंबईचा महत्त्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने संघाला पहिली विकेट मिळवून दिली. बुमराहसाठी आजचा सामना खास आहे, कारण त्याचा सामना पाहण्यासाठी वानखेडेवर त्याचा लेक अंगद पोहोचला आहे.

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना सप्टेंबर २०२३ मध्ये मुलगा झाला, ज्याचे नाव त्यांनी अंगद ठेवले आहे. अंगद बुमराह आज बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर पोहोचला आहे. बुमराहची पत्नी संजनासोबत लेक अंगद बसल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. त्या सोबतच त्याची पत्नी संजना गणेशनचा आज वाढदिवसही आहे. बुमराहने खास अंदाजात संजनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लेकाकडूनही बुमराहने संजनला कॅप्शनमध्ये शुभेच्छा दिल्या.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
andhra pradesh couple suicide
आई-वडिलांनी इंजिनिअर बनवलं, मुलगा रिक्षाचालक झाला; तृतीयपंथी जोडीदाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर पालकांनी…
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग

मुंबई इंडियन्सच्या संघाने आज चांगली कामगिरी करत धावांचा पाऊस पाडणाऱ्या हैदराबादला वेसण घातले आहे. मुंबईकडून पदार्पणाची संधी मिळालेल्या अंशुल कंबोजनेही शानदार गोलंदाजी केली. बुमराहने अभिषेक शर्माला इशान किशनकरवी झेलबाद केले. १५ षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या ५ बाद १२० इतकी आहे.

Story img Loader