Jos Buttler returns to England : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघ आयपीएल २०२४ मध्ये चांगली कामगिरी करत आहे. संघाने आतापर्यंत १२ पैकी ८ सामने जिंकले आहेत. चार सामन्यांत संघाचा पराभव झाला आहे. अशा प्रकारे राजस्थान रॉयल्सचे १६ गुण आहेत आणि संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानचे अजून दोन सामने बाकी आहेत, तत्पूर्वी राजस्थान रॉयल्ससाठी एक वाईट बातमी आली आहे. या दोन सामन्यांमध्ये संघाचा स्टार खेळाडू जोस बटलर राजस्थान रॉयल्सचा भाग असणार नाही. त्याचा एक व्हिडीओ राजस्थानने शेअर केला आहे.

राजस्थान रॉयल्सचा स्टार सलामीवीर फलंदाज जोस बटलर मायदेशी परतला आहे. आता तो आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण हे दोन्ही सामने संघाला प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जे त्यांना पंजाब किंग्ज आणि केकेआरविरुद्ध खेळायचे आहेत.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? संजय शिरसाट यांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले…
no final decision on how many ministerial posts will be distributed to BJP Shiv Sena and NCP print politics news
मंत्र्यांच्या संख्येवरून महायुतीत चर्चा सुरूच

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ पूर्वी इंग्लंड संघाला पाकिस्तानविरुद्ध चार टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ मे रोजी होणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी जोस बटलर इंग्लंडचा कर्णधार आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत सहभागी होण्यासाठी तो इंग्लंडला परतला आहे. टी-२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने पाकिस्तान आणि इंग्लंडसाठी टी-२० मालिका खूप महत्त्वाची आहे.

हेही वाचा – IRE vs PAK 2nd T20I : अफगाणिस्तानच्या चाहत्याने शाहीन आफ्रिदीशी केले गैरवर्तन, VIDEO होतोय व्हायरल

जोस बटलरची आयपीएल २०२४ मधील कामगिरी –

आयपीएल २०२४ मध्ये जोस बटलरची कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने ११ सामन्यांमध्ये ३५९ धावा केल्या आहेत. ज्यात २ शतकांचा समावेश आहे. त्याने संघासाठी अनेक चमकदार खेळी साकारल्या आहेत. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची उपस्थिती राजस्थान रॉयल्सला बळ देत होती. राजस्थान रॉयल्स संघाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले की, “मिस यू जोस भाई.”

हेही वाचा – Match Fixing : चेन्नई-राजस्थान सामना ‘फिक्स’ होता का? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सेहवागने उपस्थित केले गंभीर प्रश्न

आयपीएलमध्ये जोस बटलरच्या नावावर ३००० पेक्षा जास्त धावा –

जोस बटलर हा स्फोटक फलंदाजीत पारंगत खेळाडू आहे. एकदा तो क्रीजवर सेट झाला की त्याला आऊट करणे कठीण होते. अवघ्या काही चेंडूंमध्ये तो सामन्याचा मार्ग बदलतो. त्याने आतापर्यंत १०७ आयपीएल सामन्यांमध्ये ३५८२ धावा केल्या आहेत, ज्यात ७ शतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने १९ अर्धशतकेही केली आहेत. बटलरची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या १२४ धावा आहे.

Story img Loader