Jos Buttler guilty of breaching IPL code of conduct: आयपीएल २०२३ चा ५६ वा सामना गुरुवारी केकेआर आ आरआर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने कोलकाताचा 9 गडी राखून पराभव केला. राजस्थानच्या विजयाची हिरो ठरली यशस्वी जैस्वाल. त्याने ४७ चेंडूत ९८ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचबरोबर युजवेंद्र चहलनेही ४ विकेट घेत विजया मोलाचे योगदान दिले. दरम्यान संघाचा प्रमुख खेळाडू जोस बटलरला खातेही उघडता आले नाही. अशात सामना संपल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला आहे. कारण त्याला मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी बटलर दोषी आढळला –

वास्तविक, जोस बटलरला आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. या अंतर्गत त्याला मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. अधिकृत निवेदनानुसार, जोस बटलरला आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत लेव्हल १ गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. या कलमानुसार, जेव्हा खेळाडू वस्तू किंवा कपडे, मैदानावरील उपकरणांचा गैरवापर करतो, तेव्हा त्याला दोषी मानले जाते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मीडिया रिपोर्टनुसार जोस बटलर धावबाद झाल्यानंतर तंबूत परत असताना नाराज दिसला. त्यानंतर बटलरने रागात आपली बॅट सीमारेषवर आपटली. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सामनाधिकारीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. ज्यामुळे जोसने आपला गुन्हा मान्य केला आहे.

हेही वाचा – Virat Kohli: ‘धोनीकडून शिकलो प्रत्येकाला खूश…’; विराटच्या मुलाखतीचा VIDEO व्हायरल

बटलरला या सामन्यात खातेही उघडता आले नाही –

केकेआरविरुद्धच्या सामन्यात जोस बटलर आपले खातेही उघडू शकला नाही. दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बटलर शून्यावर धावबाद झाला. यशस्वी जैस्वालच्या चुकीच्या कॉलमुळे बटलर धावबाद झाला, पण बटलरने जैस्वालसाठी आपली विकेट सोडल्याचे दिसून आले. बटलर बाद झाल्यानंतर जैस्वालने स्फोटक खेळी खेळली. त्याने ४७ चेंडूत नाबाद ९८ धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसननेही ४८ धावांची नाबाद खेळी खेळली. राजस्थानने १५० धावांचे लक्ष्य १३.१ व्या षटकातच पार केले.

Story img Loader