RCB Creates Many Records: आयपीएल २०२३ मधील ६०व्या सामन्यात आरसीबीने आरआर ११२ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर राजस्थानच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. दरम्यान संघाचा सलामीवीर जोस बटलर या मोसमात काही खास कामगिरी करु शकलेला नाही.गेल्या मोसमात आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा बटलर आरसीबीविरुद्ध शून्यावर बाद झाला.बटलरने या मोसमात आतापर्यंत चार वेळा शून्यावर विकेट गमावली आहे. अशी कामगिरी करणारा तो यंदाच्या पहिला फलंदाज ठरला आहे त्याचप्रमाणे आरसीबीने राजस्थानला पराभूत करून अनेक उत्कृष्ट विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

चौथ्यांदा जोस बटलर शून्यावर बाद –

राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर आयपीएल २०२३ मध्ये चौथ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. या मोसमात अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. बटलर आरसीबीविरुद्धच्या सामन्यात दोन चेंडूंचा सामना करत वेन पारनेलच्या चेंडूवर सिराजच्या हाती झेलबाद झाला. या मोसमात आरसीबीविरुद्ध शून्यावर बाद होण्यापूर्वी तो केकेआर, आरसीबी आणि गुजरात टायटन्सविरुद्ध शून्यावर बाद झाला आहे. या मोसमात तो आरसीबीविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला. बटलरने या मोसमात आतापर्यंत १३ सामन्यांत ३९२ धावा केल्या आहेत.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mike Tyson, YouTube Influencer, Netflix, Mike Tyson news, Mike Tyson latest news,
विश्लेषण : माजी जगज्जेता माइक टायसन यू-ट्यूब इन्फ्लुएन्सरकरडून पराभूत! लढत खरी होती की लुटुपुटूची? फायदा नेटफ्लिक्सचाच?
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Sanju Samson Tilak Varma Smash World Record in Johannesburg with Fiery Centuries in T20I IND vs SA
IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ

आयपीएलमध्ये चार वेळा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत जोस बटलर सातव्या क्रमांकावर आहे, म्हणजेच या लीगमध्ये त्याच्या आधीचे सहा फलंदाज एका मोसमात चार वेळा शून्यावर बाद झाले आहेत. या फलंदाजांमध्ये हर्शल गिब्स, मिथुन मन्हास, मनीष पांडे, शिखर धवन, इऑन मॉर्गन आणि निकोलस पूरन यांचा समावेश आहे. त्याचवेळी, बटलर सलामीवीर म्हणून या लीगमध्ये शून्यावर बाद होणारा तिसरा फलंदाज ठरला. त्याच्या आधी गिब्स आणि धवन हे सलामीवीर फलंदाज म्हणून या लीगच्या एका मोसमात चार वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

आयपीएलच्या एका मोसमात ४ वेळा शून्यावर बाद झालेले फलंदाज –

हर्शेल गिब्स – (२००९)
मिथुन मनहास – (२०११)
मनीष पांडे – (२०१२)
शिखर धवन-(२०२०)
इऑन मॉर्गन – (२०२१)
निकोलस पूरन – (२०२१)
जोस बटलर – (२०२३)

आरसीबीने मुंबईच्या विक्रमाची बरोबरी केली –

आयपीएलमध्ये, आरसीबीने आतापर्यंत सात वेळा त्यांच्या विरोधी संघाला १०० धावांच्या आत बाद करण्यात यश मिळवले आहे. आरसीबीने राजस्थानचा डाव ५९ धावांत संपुष्टात आणले. या संघाने विरोधी संघाला १०० धावांच्या आत बाद करून मुंबईची बरोबरी करण्याची ही सातवी वेळ ठरली. मुंबईनेही या लीगमध्ये आतापर्यंत सात वेळा आपल्या विरोधी संघाला १०० धावांच्या आत गुंडाळले आहे.

आयपीएलमध्ये १०० पेक्षा कमी धावसंख्येवर सर्वाधिक वेळा प्रतिस्पर्ध्यांना गुंडाळणारे संघ –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – सात वेळा
मुंबई इंडियन्स – सात वेळा
कोलकाता नाईट रायडर्स – सहा वेळा
चेन्नई सुपर किंग्ज – पाच वेळा

आरसीबी हा आयपीएल मध्ये सर्वाधिक १०० पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवणारा संघ –

आरसीबीने ६० व्या लीग सामन्यात राजस्थानचा ११२ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर संघाने या लीगमध्ये चौथ्यांदा विरोधी संघाला १०० पेक्षा जास्त धावांच्या फरकाने पराभूत करण्यात यश मिळविले. दुसरीकडे, मुंबईने आयपीएलमध्ये एका संघाला दोनदा १०० हून अधिक धावांच्या फरकाने पराभूत करण्यात यश मिळवले आहे.