Jos Buttler Shocking Record In IPL 2023 : पंजाब किंग्जविरोधात झालेल्या सामन्यात जॉस बटलर पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला. जॉस सलग तिसऱ्यांदा शून्य धावा करून बाद झाला आहे. आयपीएल २०२३ आधी बटलरच्या नावावर मागील ८५ इनिंगमध्ये फक्त एकदा शून्यावर बाद झाल्याची नोंद आहे. परंतु, यंदाच्या हंगामातील शेवटच्या १० आयपीएल इनिंगमध्ये बटलर पाचवेळा डक आऊट झाला आहे. याचसोबत बटलरच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झालीय. आयपीएल इतिहासात बटलर एका सीजनमध्ये पाच किंवा त्याहून अधिक वेळा डक आऊट होणारा एकमेव फलंदाज बनला आहे. आयपीएलच्या या सीजनमध्ये सर्वात जास्त डक आऊट होणारे फलंदाज

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जॉस बटलर (राजस्थान रॉयल्स) – २०२३ – ५ डक
हर्शल गिब्स (डेक्कन चार्जर्स) – २००९ – ४ डक
मिथुन मन्हास (पुणे वॉरियर्स इंडिया) – २०११ – ४ डक
मनीष पांडे (पुणे वॉरियर्स इंडिया) – २०१२ – ४ डक
शिखर धवन (दिल्ली कॅपिटल्स) – २०२० – ४ डक
इओन मोर्गन (कोलकाता नाइट रायडर्स) – २०२१ – ४ डक
निकोलस पूरन (पंजाब किंग्ज) – २०२१ – ४ डक

जॉस बटलरचा आयपीएलच्या या सीजनमध्ये ५ वेळा डक आऊट होणं, विश्वक्रिकेटला थक्क करणारा विक्रम आहे. बटलरच्या खराब फॉर्ममुळं राजस्थानचं या सीजनमध्ये मोठं नुकसान झालं आहे. बटरलने आयपीएल करिअरमध्ये आतापर्यंत ९६ सामन्यांमध्ये ३२२३ धावा कुटल्या आहेत. ज्यामध्ये ५ शतक आणि १९ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात स्फोटक फलंदाजाचा असा फॉर्म पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jos buttler most duck out in ipl 2023 became 1st batsman to registered shocking record in ipl history rr vs pbks nss